ढाका : बांगलादेशातील नौखाली जिल्ह्यातील चार हजारी गावातील निवासी युसुफ अली मास्तर याने १३ नोव्हेंबर या दिवशी त्याच्या फेसबूकवरील पानावर कालीमातेच्या मूर्तीवर श्वानाने लघुशंका केल्याचे दाखवून हिंदु देवतेचे विडंबन केल्याने हिंदूंच्या धार्मिक भावना संतप्त झाल्या आहेत; मात्र पोलिसांनी या घटनेची कोणतीही नोंद न घेता गुन्हा दाखल केला नाही. (काही दिवसांपूर्वी एका फेसबूकवर मुसलमानांच्या श्रद्धास्थानाचा अवमान केल्यावरून ३ सहस्र धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण करून २० मंदिरांची तोडफोड केली होती. तसेच हिंदूंची १५० घरे जाळण्यात आली होती. पोलिसांनी तात्काळ कृती करत एका हिंदूला अटक केली. आता हिंदूंच्या श्रद्धास्थानाचा अवमान करण्यात आला आहे. हिंदू सहिष्णु आणि अल्पसंख्यांक असल्यामुळे ते कधीही कायदा हातात घेणार नाहीत; मात्र बांगलादेश सरकारने आरोपीवर तात्काळ कारवाई केली पाहिजे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
बांगलादेश मायनॉरिटी वॉच या बांगलादेशातील हिंदुत्वनिष्ठ मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष श्री. रवींद्र घोष यांना ही बातमी कळताच त्यांनी कंपनीगंज पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्याशी दूरभाषवर संपर्क केला. तेथील पोलीस ठाण्यात या घटनेची केवळ नोंद केली असून कोणाच्याही विरुद्ध गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती मिळाली. नंतर श्री. घोष यांनी नौखालीचे पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क केला. तेव्हा पोलीस अधीक्षकांनी कंपनीगंज पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्याशी चर्चा करून त्यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या घटनेला उत्तरदायी आरोपीची ओळख पटली असल्याने त्याला त्वरित अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी श्री. घोष यांनी केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात