शिवमोग्गा : कर्नाटकातील काँग्रेस सरकार येणार्या हिवाळी अधिवेशनात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा संमत करू पहात आहे. या कायद्याद्वारे हिंदूंच्या श्रद्धांचेच निर्मूलन करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याने या कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी कर्नाटकच्या शिवमोग्गा जिल्ह्यातील शिवमोग्गा शहरात राष्ट्रीय हिंदु आंदोलन करण्यात आले.
अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला विरोध करण्याबरोबरच दक्षिण भारतात हिंदुत्वनिष्ठांच्या होणार्या हत्यांना विरोध करणे, यासाठी १५ नोव्हेंबर या दिवशी शिवमोग्गा जिल्हाधिकार्यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कर्नाटक राज्य मानवाधिकार रक्षण आणि भ्रष्टाचार निर्मूलन समिती, वीर शिवप्पा नायक अभिमानी गट, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती सहभागी झाल्या होत्या. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. प्रसन्न कामत आणि कर्नाटक राज्य मानवाधिकार रक्षण आणि भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे श्री. मंजुनाथ पुजारी यांनी उपस्थितांना संबोधित केले. या आंदोलनात धर्माभिमानी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी १८ पत्रकार, २ वृत्तवाहिनींचे प्रतिनिधी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात