Menu Close

द्वारका (गुजरात) येथे तीन दिवसीय चतुर्थ पंचगव्य चिकित्सा महासंमेलनाचे आयोजन !

गोवंश रक्षण आणि स्वदेशी पंचगव्य चिकित्सा पद्धतीचे संशोधन तसेच प्रचार-प्रसार यांविषयी चर्चा होणार !

niranjan_varma

द्वारका : हिंदु धर्माने गाईला मातेचे स्थान देऊन तिला पूज्य मानले आहे. गायीला आध्यात्मिक महत्त्व तर आहेच, शिवाय आरोग्य, पर्यावरण यादृष्टीनेही भारतीय ऋषींनी तिचे महत्त्व जाणून त्यासंदर्भात लिहूनही ठेवले आहे. गायीपासून मिळणारे पंचगव्य निरामय आरोग्यासाठी उत्तम मानले जाते; मात्र काळाच्या ओघात भारतात सर्वत्र गोवंशच धोक्यात आला आहे. गोहत्या ही गंभीर समस्या झाली आहे. हिंदु धर्म, हिंदु संस्कृती आणि हिंदु समाज यांच्या दृष्टीने गोवंशाचे रक्षण करणे आणि स्वदेशी पंचगव्य चिकित्सा पद्धतीचे संशोधन तसेच प्रचार-प्रसार करणे, ही काळाची आवश्यकता झाली आहे. यासाठीच कांचीपुरम्, तमिळनाडू येथील पंचगव्य गुरुकुलम् आणि पंचगव्य चिकित्सक संघ यांच्या वतीने १९ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत चतुर्थ पंचगव्य चिकित्सा महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

भगवान श्रीकृष्ण यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या, तसेच चार प्रमुख शंकराचार्य पिठांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र द्वारका येथील लेऊआ पटेल समाज भवन (भडकेश्‍वर महादेव मंदिर आणि टी.व्ही. स्टेशनजवळ) या ठिकाणी हे महासंमेलन होणार आहे. गोवंशरक्षणासाठी धार्मिक विधी, पदयात्रा, पंचगव्य चिकित्सा तसेच गोवंश रक्षण या विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन, पंचगव्य चिकित्सकांचा सन्मान, विशेष अभ्यासवर्गांचे आयोजन, गंभीर रोगांच्या चिकित्सेवर लघुचित्रपट, पंचगव्य चिकित्सकांचे अनुभवकथन, गोरक्षा संकल्प आदी कार्यक्रम या तीन दिवसीय महासंमेलनामध्ये होणार आहेत. महासंमेलनात सहभागी होणार्‍यांसाठी २२ नोव्हेंबर या दिवशी भगवान श्रीकृष्ण यांच्या द्वारका मंदिर तसेच बेट द्वारका या स्थानांचे विशेष दर्शन आयोजित करण्यात आले आहे. महासंमेलनाच्या ठिकाणी सनातनच्या ग्रंथांचे, तसेच सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शनही लावण्यात येणार आहे.

महासंमेलनाची वैशिष्ट्ये

  • महासंमेलनाच्या तिन्ही दिवशी गोवंश रक्षणासाठी विशेष पंचमहाभूत पूजा
  • उद्घाटनप्रसंगी गुरुदेव सेवारत्न गव्यसिद्धाचार्य डॉ. निरंजनभाई वर्मा यांचे भारत निर्माण कार्यात पंचगव्य चिकित्सेची भूमिका, या विषयावर मार्गदर्शन
  • गोमाता रक्षण : काळाची आवश्यकता, या विषयावर विशेष अतिथींचे मार्गदर्शन
  • पंचगव्य विश्‍वविद्यालयाची निर्मिती आणि नूतन अभ्यासक्रमातील विषय, याविषयी दृकश्राव्य माध्यमाद्वारे अभ्यासवर्ग
  • गोरक्षा संकल्प

संमेलनात सहभागी होण्यासाठी संपर्क क्रमांक : ०९४४४९६१७२३ / ०९४४४०३४७२३

गोद्वेष्टे आणि समाजकंटक यांच्याकडून संमेलनात अडथळे आणण्याचा प्रयत्न !

काही गोद्वेष्टे आणि समाजकंटक यांनी संमेलनाचा प्रसार करणारे www.panchgavya.org हे संकेतस्थळ आणि संमेलनाशी संबंधित पत्रव्यवहारासाठीचा ई-मेल पत्ता हॅक करून या संमेलनात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही खचून न जाता आयोजकांनी संमेलन यशस्वी होण्यासाठी कंबर कसली आहे. (बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात गोरक्षणासारख्यर कार्यक्रमांमध्ये अडथळे आणण्याचे प्रयत्न होणे, हे हिंदूसंघटनाच्या अभावाचेच फलित होय ! संघे शक्ति कलौयुगे । यानुसार कलियुगात संघटितभाव हाच स्वरक्षणाचा सर्वोत्तम मार्ग आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *