Menu Close

यवतमाळ येथे सार्वजनिक उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक !

sarvajanik_baithak320

यवतमाळ : राष्ट्ररक्षण आणि धर्मरक्षण यांसाठी सार्वजनिक उत्सव मंडळांची भूमिका काय, या विषयावर १३ नोव्हेंबर या दिवशी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत श्री दुर्गा आणि श्री गणेश या मंडळांचे ७ पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी १ डिसेंबरला आयोजित हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने धर्मावर होणार्‍या आघातांना विरोध करण्याचा हिंदुत्वनिष्ठांनी निर्धार केला.

समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी राष्ट्र आणि धर्म यांसाठी सार्वजनिक उत्सव मंडळे कशा प्रकारे सेवा करू शकतात, याविषयी मार्गदर्शन केले, तसेच सार्वजनिक उत्सवांमध्ये होणारे गैरप्रकार रोखून छत्रपती शिवरायांप्रमाणे धर्माच्या नावावर संघटन करण्याचे आवाहनही केले. या बैठकीमध्ये प्रत्येक शाळेमध्ये संस्कृती रक्षण मोहीम राबवणे, ३१ डिसेंबर साजरा करण्याचा विरोध करणे, तसेच पंधरा दिवसांनी एकदा बैठक घेणे, असे ठरवण्यात आले.

या वेळी जय माँ भवानी मंडळ, जयवीरा दुर्गोत्सव मंडळ, एकता शारदा उत्सव मंडळ, जयमातादी मंडळ, स्वराज्य दुर्गाउत्सव मंडळ, हिंदू राष्ट्र मंडळ, सनातन संस्था, रणरागिणी शाखा यांचे ३० कार्यकर्ते उपस्थित होते.

हिंदू म्हणून आम्ही समितीच्या पाठीशी राहू ! – अमोल देशमुख, नगरसेवक

बैठकीत भाजपचे नगरसेवक अमोल देशमुख यांची उपस्थिती लाभली. त्यांनी शाळेतील मुलांना संस्कृती रक्षणासाठी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे, असेे सांगितले. यवतमाळ येथे हिंदू म्हणून आम्ही समितीच्या पाठीशी राहू, असे उद्गार भाजपचे नगरसेवक श्री. अमोल देशमुख यांनी या वेळी काढले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *