Menu Close

सीट बेल्ट का लावला नाही ? असा प्रश्‍न विचारणार्‍या तरुणाला पोलिसांकडून मारहाण !

police1

नागपूर : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील पोलीस अधिकार्‍यांनी सीट बेल्ट का लावले नाहीत, असा प्रश्‍न विचारणारा तरुण स्वप्नील तुपे याला पोलिसांनी पुष्कळ मारहाण केली. (अशा उद्दाम पोलिसांना कठोर शासनच व्हायला हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

स्वप्नीलने त्याच्या भ्रमणभाषमध्ये सीट बेल्ट न लावणार्‍या पोलीस वाहनचालकाचे छायाचित्र काढले आणि त्याची लेखी तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडे केली; मात्र त्याने विचारलेला प्रश्‍न न आवडल्याने सीताबर्डी पोलिसांनी मारहाण करत त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. ( स्वतःच नियमांचे उल्लंघन करायचे आणि त्याची जाणीव करून देणार्‍यावर हात उगारायचा, हा कुठला न्याय ? – संपादक , दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *