मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! मशीद आणि चर्च येथील किती निधी अधिकोषात जमा केला, हेही सरकारने घोषित करावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
प्रतिदिन दानपेट्या उघडण्याचा विचार चालू ! – जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरातील १७ दानपेट्यांची मोजदाद चालू करण्यात आली आहे. २ दिवसांत ६ दानपेट्या उघडण्यात आल्या. या दानपेट्यांमधून मिळालेली ३५ लक्ष ३३ सहस्र रुपयांची रक्कम १७ नोव्हेंबर या दिवशी अधिकोषात जमा करण्यात आली. यापुढेही श्री महालक्ष्मी मंदिरातील दानपेट्या प्रतिदिन उघडण्याविषयी विचार चालू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. अमित सैनी यांनी दिली. (हिंदु राष्ट्रात भक्तांनी अर्पण केलेला पैसा केवळ धर्मकार्यासाठीच वापरला जाईल ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१. दानपेटीत नाण्यांसह दहा, वीस, पन्नास आणि शंभर रुपयांच्याच नोटा अधिक प्रमाणात आढळून आल्या. ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटांचे प्रमाण अल्प होते. २ सहस्र रुपयांच्या १० नव्या नोटांसह सिंगापूर आणि नेपाळ देशांतील नोटाही दानपेटीत आढळल्या.
२. १७ दानपेट्यांपैकी १० दानपेट्यांची मोजदाद पूर्ण झालेली नाही. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारित असणार्या देवस्थानांतील दानपेट्या उघडण्यास १५ नोव्हेंबरपासूनच प्रारंभ करण्यात आला आहे.
३. करवीर तालुक्यातील बहिरेश्वर देवस्थानच्या दानपेटीत अवघी ३ सहस्र ३०० रुपयांची रोकड मिळाली. सांगली जिल्ह्यातील हरिपूर येथील देवस्थानच्या दानपेटीत २८ सहस्र रुपयांची रोकड मिळाली. दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा मंदिरातील दानपेेटीतून १ लक्ष ८५ सहस्र रुपयांची रक्कम मिळाली. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरातील १७ दानपेट्यांपैकी ५ दानपेट्यांतून ८ लक्ष ५३ सहस्र रुपयांची रक्कम मिळाली.
४. खजिन्याजवळील मोठी दानपेटी आणि एक हुंडी उघडण्यात आली. प्रमुखांच्या उपस्थितीत त्यातील रक्कम गरूड मंडपात आणून मोजण्यात आली.
५. दिवसभर देवस्थानच्या २५ कर्मचार्यांद्वारे मोजदाद चालू होती. मोठ्या दानपेटीतून २५ लक्ष रुपये, तर हुंडीतून १ लक्ष ७० सहस्र रुपये मिळाले. ही सर्व रक्कम अधिकोषात जमा करण्यात आली.
६. उर्वरित सर्व दानपेट्यांची मोजदाद करण्यास आणखी ५-६ दिवस लागण्याची शक्यता आहे. यांसह देवस्थान समितीच्या अखत्यारित असलेल्या अन्य मंदिरांतील दानपेट्याही उघडण्यात येणार आहेत.
७. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या दानपेटीत नवरात्रोत्सवाच्या काळात ५७ लक्ष रुपयांचे रोख दान झाले आहे. यांसह सोन्या-चांदीचे दागिनेही दान म्हणून आले आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात