आयकर खाते चर्च आणि दर्गे यांच्याकडून कधी माहिती घेणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
अयोध्या – अयोध्येतील सर्व धार्मिक संस्था आणि मंदिरे यांना ८ नोव्हेंबरपर्यंत देणगीच्या स्वरूपात जमा झालेल्या प्रत्येक रुपयाचा हिशोब द्या, अशी नोटीस आयकर विभागाने पाठवली आहे. नोटा रहित झाल्यानंतर काळा पैसा असणार्यांनी मंदिरात तो अर्पण केल्याचे लक्षात आल्यानंतर सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आयकर खात्याने मंदिरांना ताळेबंद सादर करण्याची नोटीस बजावली आहे. हिशोेबात विसंगती आढळल्यास संबंधित संस्थेवर कारवाई करण्यात येईल, असे आयकर आयुक्त विजय कुमार यांनी सांगितले.
आमचा कारभार पारदर्शी असल्याने आम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही, असे अयोध्येतील पातेश्वरी मंदिर प्रशासनाने म्हटले आहे.
नोटीस मिळाल्यानंतर आम्ही पुढील दिशा ठरवू, असे अयोध्येतील अनेक देवस्थानांची करविषयक प्रकरणे हाताळणारे अधिवक्ता अनुज सिंघल यांनी म्हटले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात