Menu Close

डॉ. झाकीर नाईक हिंदूंच्या देवतांच्या विरोधात भाषणे देऊन लादेनचे गुणगान करत होता ! – केंद्र सरकारचे गृहमंत्रालय

हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍या प्रत्येकावर सरकारने कठोर कारवाई करावी, अशीच हिंदूंची मागणी आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

zakir_naik
नवी देहली – इस्लामचा प्रचारक म्हणून काम करणारे डॉ. झाकीर नाईक हिंदूंच्या देवतांच्या विरोधात भाषणे देत होते. तसेच अल् कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याचे गुणगान करणे, हा त्यांचा एककलमी कार्यक्रम होता, असे केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने म्हटले आहे.

केंद्र सरकारने डॉ. झाकीर यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊण्डेशन या संस्थेवर देशविघातक कृत्यात सहभागी असल्याचा ठपका ठेवत बंदी घातली आहे. सरकारने त्यांच्या संस्थेवर बंदी घालत असताना बंदीसाठीची कारणे देतांना वरील माहिती दिली आहे.
डॉ. झाकीर त्यांच्या भाषणांमध्ये प्रत्येक मुसलमानाने आतंकवादी असायला हवे आणि इस्लामने ठरवले असते, तर देशात ८० टक्के हिंदू राहिलेच नसते; कारण त्यांना तलवारीच्या बळावर मुसलमान करण्यात आले असते, असेही म्हणत होते. तसेच सुवर्ण मंदिर इतके पवित्र नाही जितके मक्का आणि मदिना आहे, असेही त्यांनी म्हटले होते. डॉ. झाकीर यांनी आत्मघाती बॉम्बस्फोटांना योग्य ठरवले होते. केंद्रीय गृहमंत्रालयाने डॉ. झाकीर यांच्या संस्थेवर बंदी घालण्यासाठी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, इस्लामिक रिसर्च फाऊण्डेशन, त्याचे सदस्य आणि स्वत: डॉ. झाकीर समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत होते. दोन धर्मांमध्ये कटुता निर्माण व्हावी यासाठी लोकांना प्रोत्साहित करत होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *