Menu Close

हिंदुद्वेषी खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेस अनुमती देऊ नये आणि त्यांना सातारा जिल्हा प्रवेश बंदी करावी !

धर्मरक्षणासाठी संघटितपणे कृतीशील होणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन !

ईश्‍वरपूर आणि कराड येथील हिंदुत्वनिष्ठांची पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी

ishwarpur_dharmaabhimani
कराड शहर पोलीस अधीक्षकांना निवेदन देतांना धर्माभिमानी

ईश्‍वरपूर आणि कराड : ईश्‍वरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी २० नोव्हेंबर या दिवशी ईश्‍वरपूर येथे, तसेच कराडमध्ये ऑल इंडिया मजलिस-ए-इतेहादुल मुसलमीन (एम्.आय्.एम्.) या पक्षाचे संस्थापक आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. ओवैसी हे त्यांच्या भाषणांमधून वारंवार हिंदुद्वेषी आणि जातीय तेढ पसरवणारी वक्तव्ये करतात. त्यांच्या भाषणांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, तरी ओवैसी यांच्या सभेस अनुमती देऊ नये, असे निवेदन समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने ईश्‍वरपूर पोलीस ठाण्यात देण्यात आले. या वेळी श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. गजानन पाटील, हिंदु धर्माभिमानी सर्वश्री स्वप्नील माळी, प्रशांत पाटील, पृथ्वीराज पाटील, इंद्रजीत पाटील यांसह हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.

ishwarpur_dharmabhimani2
कुरुंदवाड येथे पोलीस उपनिरीक्षक निवेदन स्वीकारतांना

ओवैसी यांची सभा रहित करून त्यांना सातारा जिल्हा प्रवेश बंदी करावी, याविषयीचे निवेदन कराड शहर पोलीस अधीक्षक श्री. प्रमोद जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजलक्ष्मी शिवणकर यांना देण्यात आले. या वेळी योग वेदांत सेवा समितीचे श्री. चंद्रकांत कुंभार, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. ओमकार माने, श्री. विजय चव्हाण, सनातन संस्थेचे साधक, अंकुश लोहार, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

ishwarpur_police
ईश्‍वरपूर पोलीस ठाण्यात निवेदन देतांना धर्माभिमानी

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *