भोपाळ : येथे मध्यप्रदेश शासनातर्फे लोकमंथन : देश-काल-स्थितीया विषयावर विचारवंत आणि कार्यकर्ते यांचे नुकतेच एक संमेलन पार पडले. या वेळी देश-विदेशातील विचारवंतांनी यात सहभाग घेतला होता. यात हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातनचे साधक यांचाही सहभाग होता. या वेळी समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेऊन त्यांना धर्मशिक्षण फलक हा ग्रंथ भेट दिला.
या संमेलनाच्या वेळी आलेल्या विविध मान्यवरांची समितीच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली. तिबेटचे माजी पंतप्रधान सामदोंग रिनपोछे यांची भेट घेऊन त्यांना तिबेटच्या प्रश्नावर समिती आणि सनातन संस्थेने आतापर्यंत केलेल्या आंदोलनाचा आणि या प्रश्नाला असलेल्या पाठिंब्याविषयी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांनी माहिती दिली. तसेच जून २०१७ मध्ये गोव्यात होणार्या षष्ठम अखिल भारतीय हिंदु अधिवेशनात सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले. रिनपोछे यांनी अधिवेशनात सहभागी होऊ, असे या वेळी आश्वासन दिले. पाकवंशाचे कॅनडातील प्रसिद्ध पत्रकार तारेक फतेह यांचीही श्री. चेतन राजहंस यांनी भेट घेतली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात