Menu Close

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून मंदिराच्या प्रांगणात गोहत्या आणि गोमांस भक्षण करून देवतांची विटंबना !

दादरी (उत्तरप्रदेश) येथील अखलाकच्या प्रकरणावरून गळे काढणारे आणि पुरस्कार परत करणारे बांगलादेशातील हिंदूंच्या श्रद्धास्थानांवरील आघातांवर तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

langalbandh_clr

ढाका – येथील लांगलबांधस्थित श्री श्री चतुर्मुख ब्रह्मा मंदिराच्या प्रांगणात ११ नोव्हेंबर या दिवशी धर्मांधांनी २ गायींची हत्या केली आणि गोमांसाचे पदार्थांची पाहुण्यांना मेजवानी दिली.

१. मार्फत अली याने त्याच्या पित्याच्या मृत्यूनंतर दहाव्या दिवशी नातेवाईक आणि मित्र यांना निमंत्रित करून वरील प्रकार केला.

२. मंदिराचे सेवक श्री. माधव चक्रवर्ती यांनी १४ नोव्हेंबर या दिवशी नारायणगंज येथील बंदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली

३. या मंदिराच्या भूमीवर बांगलादेशातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अतिक्रमण करून ही भूमी बळकावली आहे.

४. बांगलादेशातील बांगलादेश मायनॉरिटी वॉच या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने हस्तक्षेप करून बंदर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांशी संपर्क केला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून मार्फत अली याला अटक केली.

५. लांगलबांध येथे ब्रह्मपुत्रा नदीत प्रत्येक चैत्र मासाच्या शेवटच्या दिवशी लक्षावधी हिंदू पवित्र स्नानासाठी येतात.

स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात

 

Related News

0 Comments

  1. Vikram

    It is very important that the BJP Govt. to be formed in Maharashtra or the Central Govt. should either put Sadhviji and Col. Purohit on trial or let them go. The Hindu people expect the Govt. to do so.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *