हिंदु विधीज्ञ परिषदेने केलेल्या तक्रारीचा परिणाम
सातारा – बलात्कारासारख्या आरोपात तीन महिने कारागृहात राहिलेले उपराकार लक्ष्मण माने यांची नुकतीच न्यायालयाने पुराव्याअभावी मुक्तता केली. खटल्यातून मुुक्त होताच माने यांनी त्यांच्या स्वत:च्या घरी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत माने यांनी सनातनचे आश्रम उद्ध्वस्त करणार, अशी धमकी दिली होती.
माने यांच्या या जाहीर धमकीनंतर हिंदु विधीज्ञ परिषदेने सातारा येथील पोलीस अधीक्षक, पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली होती. अशाप्रकारे पत्रकार परिषद घेऊन धमक्या देणारे माने यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेने आपल्या तक्रारीत केली होती. त्यावर सातार्याच्या पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार सातारा येथील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडून माने यांची चौकशी चालू करण्यात आली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात