राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा चळवळ !
मुंबई : प्रजासत्ताक दिनी म्हणजे २६ जानेवारीला राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यात यावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कर्णावती (अहमदाबाद), बडोदा, जोधपूर आणि वाराणसी या ठिकाणी शासनाला निवेदन देण्यात आले.
गुजरातमधील कर्णावती येथे जिल्हाधिकारी राजकुमार बेनीवाल, तसेच बडोदा येथील जिल्हाधिकारी सौ. अवंतिका सिंह यांना ४ जानेवारी या दिवशी निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी कर्णावती येथे धर्माभिमानी सर्वश्री मुक्तेश सिंह, हिंदु जनजागृती समितीचे श्रीरंग दातार, वैभव आफळे सनातन संस्थेच्या सौ. दीप्ती रामी, सौ. नीला कद्रेकर, सौ.पारुल मांडे, तर बडोदा येथे ओम साई मित्र मंडळाचे श्री. भारद्वाज, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. मनीषा गोडबोले, सनातन संस्थेच्या सौ. पल्लवी अभ्यंकर उपस्थित होत्या.
जोधपूर (राजस्थान) येथे जिल्हाधिकार्यांना निवेदन
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी अरुणकुमार साजिया आणि विभागीय आयुक्त श्रीमती वंदना सिंघवी यांना निवेदन सादर केले. याप्रसंगी सर्वश्री अधिवक्ता मोतीसिंह राजपुरोहित, नरेंद्रसिंह, नरेश कच्छावा, रमेश कच्छावा, नवरतन प्रजापत, भैराराम, आनंद जोशी, हिंदु जनजागृती समितीचे राजस्थान समन्वयक गजानन केसकर, आनंद जाखोटिया आणि सौ. राखी मोदी उपस्थित होत्या.
वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन
वाराणसी येथे जिल्हाधिकारी राजमणी यादव आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी डी.पी.एन्. पांण्डेय यांना निवेदन देण्यात आले. या वेळी अधिवक्ता अरुण मौर्य, अधिवक्ता स्वतंत्रकुमार सिंह, अधिवक्ता संजीवन यादव, अधिवक्ता राकेशकुमार सिंह, अधिवक्ता कमलेशचंद त्रिपाठी, अधिवक्ता देशरत्न श्रीवास्तव यांच्यासह हिंदु जनजागृती समितीचे प्रशांत पाठक, राजन केसरी आणि सनातन संस्थेचे निलय आदि उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात