काँग्रेस सरकारची मोगलाई ! देश-विदेशात दूरचित्रवाहिन्यांवरून फलज्योतिषाचे कार्यक्रम सादर केले जात असतांना फलज्योतिषावर बंदी घालू पहाणार्या कर्नाटकातील काँग्रेस सरकारने फलज्योतिषाविषयीचा कोणता अभ्यास केला आहे ? कि ते पुरो(अधो)गाम्यांना खुश करण्यासाठी हा खटाटोप करत आहे ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
बेंगळुरू : समाजात अंधश्रद्धा पसरू नयेत, असे कारण पुढे करून कर्नाटकातील काँग्रेस सरकारने फलज्योतिषाविषयीचे सर्वच कार्यक्रम राज्यातील दूरचित्रवाहिन्यांवरून प्रसारित करण्यावर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रस्ताव बनवला आहे. राज्यातील बहुतेक वाहिन्या फलज्योतिषाविषयीचे कार्यक्रम नियमितपणे प्रसारित करत असतात.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, कर्नाटकातील प्रत्येक दूरचित्रवाहिनीला फलज्योतिषाविषयीचे कार्यक्रम प्रसारित करावेत, असे वाटत असते. अशा कार्यक्रमांना मोठा दर्शकवर्गही असतो; पण आता अशा अंधश्रद्धा पसरवणार्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची वेळ आली आहे.
यापूर्वी वर्ष २०१३ मध्ये अशा कार्यक्रमांवर बंदी घालण्याचे विधेयक संमत केले होते; मात्र दूरचित्रवाहिन्या आणि इतरांकडून दबाव आल्याने त्याची कार्यवाही होऊ शकली नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात