-
एका हिंदु युवकाला अटक !
-
हिंदु युवकांचा छळ थांबवण्याची मागणी !
-
मोठ्या संख्येने शिवसैनिक मडगाव पोलीस अधिकार्यांना खडसवण्यासाठी पोलीस ठाण्यात
हिंदु युवकांवर तत्परतेने कारवाई करून मर्दुमकी गाजवणारे पोलीस ! हे पोलीस टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याचा घाट घालून सामाजिक तेढ निर्माण करू पहाणार्या धर्मांधांवर मात्र कोणतीही कारवाई का करत नाहीत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मडगाव – टिपू सुलतान यांचा गोवा राज्याशी कोणताही ऐतिहासिक संबध नसतांना मडगाव येथे काही धर्मांधांनी २० नोव्हेंबर या दिवशी टिपूू सुलतान जयंती साजरी करण्याचा घाट घातला आहे. या संदर्भात अवैधपणे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले होते; मात्र स्थानिक शिवसाम्राज्य संघटनेच्या जागरूक हिंदूंनी या अवैध फलकांच्या विरोधात तक्रार करून हे फलक काढण्यास प्रशासनाला भाग पाडले. हे सर्व घडल्यानंतर काही मुसलमानांच्या दुचाकी वाहनांना कोणीतरी आग लावली आणि त्याचा आळ शिवसाम्राज्य संघटनेच्या हिंदुत्वनिष्ठांवर घालण्यात आला आहे. पोलिसांनी या संदर्भात दिनेश पिल्ले (वय ३५ वर्षे) या हिंदु युवकाला अटक केली आहे. अन्य हिंदुत्वनिष्ठ युवकांचा पोलीस शोध घेत आहेत. या कारवाईचा निषेध करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने मडगाव पोलीस ठाण्यात जमून या अन्याय कारवाईच्या विरोधात पोलीस अधिकार्यांना खडसवले आणि हिंदु युवकांचा हा छळ थांबवण्याची मागणी केली. या वेळी शिवसेनेचे सहराज्यप्रमुख श्री. शिवप्रसाद जोशी उपस्थित होते.
टिपू सुलतान जयंती साजरी करण्याचा धर्मांधांनी घाट घातल्यामुळे १८ नोव्हेंबर या दिवशी तणाव निर्माण झाला. हिंदूंनी सनदशीर मार्गाने टिपू सुलतान जयंतीच्या आयोजनासाठी लावलेले अवैध पोस्टर्स काढण्याची मागणी पोलिसांकडे केली. बराच पाठपुरावा केल्यानंतर पोलिसांनी हे फलक काढले (क्रूर टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याचा धर्मांधांचा डाव हाणून पाडणार्या मडगाव येथील हिंदूंचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात); मात्र रात्री घोगळ हाऊसिंग बोर्ड येथे अज्ञातांनी ४ दुचाकींना आग लावली. या संदर्भात १९ नोव्हेंबर या दिवशी घोगळ येथील हिंदुत्वनिष्ठ युवक दिनेश पिल्ले (वय ३५ वर्षे) यांना पोलिसांनी अटक केली आणि त्यांच्यावर कलम १४३, १४७, ३४१, ४३५, ५०६ आणि १४९ या कलमांखाली गुन्हा नोंद केला आहे. रात्री उशिरा पिल्ले यांची १० सहस्र रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात