डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे प्रकरण
पुणे – केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे अन्वेषण करण्यात दिरंगाई का केली जात आहे ? स्कॉटलंड यार्डला पाठवलेल्या गोळ्यांचा अहवाल येण्यासही विलंब लागत आहे. अन्वेषण करतांना वेळकाढूपणाचे काम केले जात आहे, असा आरोप अंनिसचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी केला. २० नोव्हेंबर या दिवशी येथील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर करण्यात आलेल्या आंदोलनाच्या वेळी ते बोलत होते. (आतापर्यंत सनातनवर पूर्वग्रहातून मनमानी आरोप करून डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचे अन्वेषण भरकटवण्यास अंनिसने साहाय्य केले. प्रारंभीपासूनच त्यांनी यंत्रणांची दिशाभूल करून सनातनवर चिखलफेक केली. सनातन संस्थेने कोणताही गुन्हा केलेला नसतांना केवळ त्या दृष्टीनेच अन्वेषण झाल्याने खर्या मारेकर्यांपर्यंत पोेचण्यात अपयश आले आहे. विवेकाची भाषा बोलणारे अंनिसवाले हे सत्य स्वीकारण्याचे धाडस दाखवतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) श्री. सारंग अकोलकर आणि श्री. विनय पवार यांना फरार म्हणून घोषित करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात