भूमाता ब्रिगेड आणि कथित पुरोगामी यांचा शनिमंदिराच्या चौथर्यावर चढण्याच्या प्रयत्नांच्या विरोधात जनमत प्रक्षुब्ध !
नगर (महाराष्ट्र) : पुरोगामित्वाच्या नावाखाली शनिमंदिराच्या चौथर्यावर चढण्याचा प्रयत्न करणार्या प्रसिद्धीलोलुप महिलांच्या विरोधात जनमत प्रक्षुब्ध होत असल्याचे पहायला मिळत आहे. हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने धार्मिक परंपरांचे रक्षण करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या अभियानाच्या अंतर्गत २६ जानेवारी या दिवशी भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना चौथर्यावर चढण्यापासून रोखण्यासाठी देवस्थानाला सुरक्षाकडे करण्यात येणार आहे.
या संदर्भात जनजागृती करण्यासाठी नेवासा फाटा येथील सुयोग मंगल कार्यालय या ठिकाणी ७ जानेवारी या दिवशी हिंदुत्वनिष्ठांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थित हिंदुत्ववाद्यांनी धर्मरक्षणासाठी कृतीशील होण्याचा निर्धार व्यक्त करत आसपासच्या १०० गावांमध्ये जाऊन ग्रामस्थांना जागृत करणार असल्याचे सांगितले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनी उपस्थित ७० हून अधिक हिंदुत्ववाद्यांना संबोधित केले.
बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान आदी संघटनांचे कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात