जबलपूर (मध्यप्रदेश) येथे ‘एक भारत अभियान – कश्मीर की ओर’च्या अंतर्गत सभा !
जबलपूर : काश्मीर बळकावू पहाणार्या फुटीरतावाद्यांचे सरकार आज ऐकत असेल, तर आमचेही म्हणणे शासनाने ऐकावे; कारण काश्मीर आमची भूमी आहे. आम्हाला तेथे विनाअट केंद्रशासनाचे नियंत्रण असलेला स्वतंत्र भूभाग हवा. काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अन्यायाविषयी पुष्कळ थोड्या लोकांना माहिती होते; पण आज हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने देशभरातील हिंदूंमध्ये याविषयी जागृती झाली आहे. काश्मिरी पंडितांवरील (काश्मिरी हिंदूंवरील) अन्यायाच्या विरोधात देशभरातील हिंदूंचा हा पुढाकार भारावून टाकणारा आहे, असे प्रतिपादन ‘युथ फॉर पनून कश्मीर’चे अध्यक्ष राहूल कौल यांनी केले. ते येथील ‘हॉटेल समदाडिया इन’च्या सभागृहात २० नोव्हेंबरला सायंकाळी ५ ते ७ या वेळेत पार पडलेल्या ‘एक भारत अभियान – कश्मीर की ओर’च्या अंतर्गत हिंदु धर्मजागृती सभेला उपस्थित २०० युवकांना मार्गदर्शन करत होते. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे, हिंदू सेवा परिषद (जबलपूर)चे प्रदेशाध्यक्ष श्री. अतुल जेसवानी, शहराध्यक्ष श्री. निखिल कनौजिया आणि सनातन संस्थेचे श्री. आनंद जाखोटिया उपस्थित होते.
काश्मीरच्या आतंकवादाला हिंदूंचा राष्ट्रवाद उत्तर देईल ! – रमेश शिंदे
हिमालय, कैलास अशी संस्कृत नावे असलेली स्थाने, ती भूमी हिंदूंचीच असल्याचे वारंवार सिद्ध करतात. त्यामुळे काश्मीरच्या आझादीच्या घोषणा देणार्यांनी हे लक्षात घ्यावे की, आता ४ लाख ५० सहस्र विस्थापित काश्मिरी हिंदूंसमवेत देशभरातील १०० कोटी हिंदु जनता आहे. ‘हर घर में अफझल निकलेगा’, अशा घोषणा देणार्यांनी लक्षात घ्यावे की, आता हिंदु समाज जागृत होत असून ‘प्रत्येक घरातून निघणार्या अफझलला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवल्याप्रमाणे धडा शिकवल्याशिवाय आम्ही रहाणार नाही.’ काश्मीरच्या या आतंकवादाला हिंदूंचा राष्ट्रवादच उत्तर देईल.
काश्मिरी हिंदूंच्या लढ्यात आम्ही सर्वांत पुढे असू ! – अतुल जेसवानी
धर्मांध हिंदूंना दाबण्याचा प्रयत्न करतात आणि हिंदू दबून जातो, ही हिंदूंची मनोवृत्ती आहे. भगवा पट्टा, कपाळावर नाम, भगवा सदरा घालून रस्त्यावर फिरून तर पहा, त्याचा धर्मांधांवर काय फरक पडतो. काश्मीरची समस्या असेल किंवा राममंदिराची, त्यासाठी आपल्याला लढा द्यायचाच आहे; पण सर्वप्रथम आपल्या शहरातील धर्मांधांना त्यांची जागा दाखवायची आहे. वेळ आल्यावर काश्मिरी हिंदूंच्या रक्षणासाठीही आम्ही सर्वात पुढे असू.
गावागावांत काश्मीर बनत आहे ! – श्री. निखिल कनौजिया
प्रत्येक घराघरांत आणि गावागावांत काश्मीर सिद्ध झाले आहे. काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासह आपल्याला प्रत्येक ठिकाणी सिद्ध होत असलेल्या धर्मांधांनाही तोंड द्यायला हवे.
देशावरील इस्लामिक स्टेटचे संकट रोखण्यासाठी काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन आवश्यक ! – आनंद जाखोटिया
विद्यादेवीचे शारदापीठ, आद्यशंकराचार्यांची कर्मभूमी आणि कश्यप ऋषींची तपोभूमी असलेले काश्मीर आम्ही कदापी आतंकवाद्यांच्या हाती जाऊ देणार नाही. ही भूमी साक्षात् देवी पार्वती आहे आणि ही भूमी आतंकवाद्यांच्या हातून सोडवण्यासाठी आम्ही शिवभक्त तांडव केल्याशिवाय रहाणार नाही.
क्षणचित्रे
१. या सभेच्या पूर्वी सभास्थळी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला पत्रकारांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला.
२. सभेच्या वेळी युवकांनी उत्स्फूर्त घोषणांनी सभागृह दणाणून सोडले.
३. श्री. अतुल जेसवानी यांच्या वतीने उपस्थितांना सनातन पंचांग २०१६ चे वितरण करण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात