भारतातील किती वर्तमानपत्रांनी बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाची नोंद घेतली आहे ? भारतातील वर्तमानपत्रांचे वाचक हिंदू असतांना तथाकथित निधर्मीवादाच्या नावाखाली भारतातील आणि विदेशातील हिंदूंवरील आक्रमणांकडे ते दुर्लक्ष करतात, हे लक्षात घ्या ! अशा वर्तमानपत्रांवर बहिष्कारच घालायला हवा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
न्यूयॉर्क : अमेरिकेचे प्रथितयश वृत्तपत्र ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने बांगलादेशमधील हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणाची एका संपादकीयमधून नोंद घेऊन बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्यावर टीका केली आहे. गेल्या २ वर्षांपासून हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या घटना या संपादकीयमध्ये नमूद करण्यात आल्या आहेत. नुकतेच ३० ऑक्टोबर या दिवशी नसीरनगर येथे फेसबूकवरून इस्लाम धर्माचा कथित अवमान केल्याच्या घटनेवरून झालेल्या हिंसाचाराचा दाखला यात दिला गेला आहे.
१. रसराज दास नावाच्या अशिक्षित हिंदु युवकाच्या नावे फेसबूकवर खोटे खाते उघडून त्यावर भगवान शिवाचे आणि मक्केचे चित्र प्रसारित केले; म्हणून सहस्रो मुसलमानांनी २० मंदिरे आणि हिंदूंच्या १०० हून अधिक घरांची हानी केली. शेवटी हा प्रकार ढाका येथून घडवण्यात आला, असे चौकशीत निष्पन्न झाल्याचे बांगलादेशच्या सैदुल हक या मंत्र्यांनी मान्य केले.
२. या हिंसाचारात पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचे आणि त्यात सत्ताधारी पक्षाच्या अवामी लीग नेत्यांचाही सहभाग असल्याचे संपादकीयमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यापैकी ३ नेत्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले; मात्र निलंबन पुरेसे नसून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही ‘न्यूयॉर्क टाइम्स’मधून करण्यात आली आहे.
३. या हिंसाचाराला उत्तरदायी असलेले अनेक धर्मांध पोलिसांच्या अटकेत आहेत आणि काही पोलीस अधिकार्यांनाही निलंबित करण्यात आले आहे.
४. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या त्यांच्या देशाचा कारभार धर्मनिरपेक्ष तत्त्वावर चालतो, असा दावा करतात; मात्र त्यांच्याच पक्षातील नेते हिंदूंवर अत्याचार करण्यात पुढाकार घेतात. हा विरोधाभास ‘न्यू यॉर्क टाइम्स’ या वृत्तपत्राने उघड केला आहे. (भारतातील बहुतेक राजकीय पक्षांचे सरकार स्वतःला धर्मनिरेपक्ष असल्याचे सांगत हिंदूंवर अत्याचार करणार्यांना एकतर पाठीशी घालतात किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात )
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात