नमाजपठणाची सवलत बंद केल्याच्या निषेधार्थ संप पुकारल्याचे प्रकरण
वॉशिंग्टन : नमाजपठणासाठी देण्यात येत असलेली वेळेची मुभा काढून घेतल्याच्या निषेधार्थ काम बंद करून संपावर गेलेल्या १९० मुसलमान कर्मचार्यांना फोर्ट मॉर्गन (अमेरिका) येथील कारगिल मीट कॉम्प्लेक्स या मांस आस्थापनाने कामावर काढून टाकले आहे.
कामावरून काढून टाकण्यात आलेले बरेचसे कर्मचारी सोमालिया देशातील आहेत. कारगिल मीट कॉम्प्लेक्स या आस्थापनात काही वर्षांपासून मुसलमान कर्मचार्यांसाठी नमाज पठणासाठी वेगळी खोली ठेवण्याची मूभा देण्यात येत होती; मात्र नमाज पठणानंतर या कर्मचार्यांच्या पुन्हा कामावर येण्याच्या वेळेत अनियमितता येऊ लागली होती. त्यामुळे आस्थापनाच्या निरीक्षकाने ही सोय बंद करण्याचा निर्णय घेतला. याच्या विरोधात मुसलमान कर्मचार्यांनी काम बंद ठेवून संप पुकारला. त्यानंतर संपावर गेलेल्या या कर्मचार्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय आस्थापनाने घेतला. यासंदर्भात काऊन्सिल ऑन अमेरिकन-इस्लामिक रिलेशन्स या संघटनेचे प्रवक्ता म्हणाले, नमाजपठण न करून अल्लाच्या आशीर्वादापासून वंचित रहाण्यापेक्षा नोकरी सोडून देणे त्यांनी निवडले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात