Menu Close

महिलांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ वाढवणे आवश्यक ! – सौ. शुभा सावंत, रणरागिणी

गोळजुवे, गोवा येथे हिंदु धर्मजागृती सभा

hjs-dharmasabha

म्हापसा (गोवा) – महिलांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ वाढवणे आवश्यक आहे. या अनुषंगाने ‘रणरागिणी’ शाखा अनेक उपक्रम राबवत असते आणि या उपक्रमामध्ये महिलांनी सहभागी होणे आवश्यक आहे. महिलांवरील अत्याचार वाढत असून हे अत्याचार रोखण्यासाठी महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गात सहभागी होणे आवश्यक आहे, तसेच महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याबरोबरच संघटनशक्तीही वाढवली पाहिजे, असे आवाहन ‘रणरागिणी’च्या सौ. शुभा सावंत यांनी केले. हिंदु जनजागृती समितीने श्री हनुमान राष्ट्रोळी पंचायत देवस्थान, गोळजुवे (बार्देश) येथे १९ नोव्हेंबर या दिवशी आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ‘स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता’ या विषयावर बोलतांना त्यांनी हे आवाहन केले. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक श्री. गोविंद चोडणकर यांची उपस्थिती होती.

‘रणरागिणी’च्या सौ. शुभा सावंत पुढे म्हणाल्या, ‘‘आज समाजात पुरोगामी महिलांना स्थान नाही. वेगवेगळ्या पंथांमध्ये महिलांना वेगवेगळे स्थान असले, तरी हिंदु धर्मामध्ये स्त्रीला देवीसमान मानले आहे.’’ श्री. गोविंद चोडणकर यांनी या वेळी ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि त्यासाठी करावयाचे प्रयत्न’ या विषयावर म्हटले की, आज शासन मंदिर सरकारीकरणाच्या नावाखाली मोठमोठी मंदिरे कह्यात घेत आहे. या मंदिरांमध्ये अर्पण करण्यात येणारे धन शासन अल्पसंख्यांकांसाठी वापरते. शासनाच्या मंदिर सरकारीकरणाच्या या धोरणाला हिंदूंनी सनदशीर मार्गाने विरोध केला पाहिजे. काश्मिरी हिंदूंनी काश्मीरमध्ये सन्मानाने पुनर्वसन करणे काळाची आवश्यकता आहे. ‘बिलिव्हर्स’पंथीय विविध आमिषे दाखवून हिंदूंचे धर्मांतर करत आहेत. हे रोखण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्याबरोबरच याला सनदशीर मार्गाने विरोध केला पाहिजे. सभेच्या प्रारंभी सौ. अंजली नायक यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची ओळख करून दिली. सभेत सूत्रसंचालन सौ. प्रगती मयेकर यांनी केले. सभेला हळदोणा पंचायतीचे पंचसदस्य श्री. चारूदत्त पणजीकर, देवस्थानचे अध्यक्ष रामा तारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *