हुबळ्ळी – येथे आयोजित ‘श्रीमद् उज्जयनी श्री सिद्धलिंग जद्गुरु पुराण’ या कार्यक्रमात १९ नोव्हेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘धर्मशिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये ‘नमस्कार करण्याची योग्य पद्धत, वाढदिवस कसा साजरा करावा?, देवळात दर्शन कसे घ्यावे ?’ इत्यादी धार्मिक कृतींच्या संदर्भात समितीच्या कु. नागमणी आचार्य यांनी माहिती दिली. श्री गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी यांनी समितीच्या कार्याची प्रशंसा केली आणि श्री मरुलसिद्ध शिवाचार्य स्वामी यांनी समितीच्या कार्याला आशीर्वाद दिले, तसेच २१ नोव्हेंबरच्या कार्यक्रमात ग्रंथप्रदर्शन लावण्याची अनुमतीही दिली. सुमारे १५० जणांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात