Menu Close

‘हिंदुस्थान कुणाच्या बापाची जहागीर नाही !’ – असदुद्दीन ओवैसी

‘मानेवर सुरी ठेवली, तरी ‘भारतमाता की जय’ म्हणणार नाही’, असे म्हणणारे भारतद्वेषी असदुद्दीन ओवैसी

Owaisi
असदुद्दीन ओवैसी

सातारा – आपला इतिहास आठवा, आपण कुणाचेही मिंधे नव्हतो. आज कोणीही उठतो आणि मुसलमानांना दोष देत सुटतो. माझ्या गरीब आणि निराधार मुसलमान बांधवांना कधी गोवंश हत्याबंदी, तर कधी आरक्षणाच्या सूत्रावरून नेहमीच सतावले जाते. दलितांना आता अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासाठी भांडावे लागत आहे. आतापर्यंत आपण घाबरत होतो, त्यामुळे असंघटित होतो. आता निर्णय घेण्याची योग्य वेळ आली आहे. निश्‍चितच यापुढील काळात हिमतीने निर्णय घेतले जातील. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत आमच्या पूर्वजांनी जे निर्णय घेतले, ते नेभळटपणाचे होते. हा देश आमचाही आहे. हिंदुस्थान कुणाच्या बापाची जहागीर नाही, असे उद्गार एम्.आय.एम्. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी काढले. (मुघलांचा वारसा सांगणारे ओवैसी भारत भूमीवर त्यांच्या पूर्वजांनी आक्रमण करण्याअगोदर ही भूमी राम-कृष्णादी अवतारांची आहे, याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. अशाप्रकारे ते मुसलमानांना चिथावणी देऊन कायदा-सुव्यवस्था बिघडवत नाही का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

कराड (जिल्हा सातारा) येथील नगरपालिका निवडणुकींच्या पार्श्‍वभूमीवर मंडईमधील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

ओवैसी पुढे म्हणाले की,

१. आतापर्यंत आपल्याला सर्वधर्मसमभाव शिकवण्यात आला. आपण याला बळी पडलो. आज संसदेत अनेक मुसलमान आमदार, खासदार आहेत; मात्र माझ्या मुसलमान बांधवांसाठी कोण आवाज उठवते का ? भारताला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे होत आली. आपण इतरांना निवडून दिले; परंतु आपल्याला काय मिळाले ? (स्वातंत्र्यपूर्व काळात केवळ ३ प्रतिशत असणारे मुसलमान आता ३० प्रतिशत झाले आहेत. स्वार्थी राज्यकर्त्यांमुळे जगात कुठेही सवलती आणि सुरक्षितता मुसलमानांना नसेल तेवढी ती भारतात आहे. असे असूनही स्वत:च्या स्वार्थासाठी ओवैसी मुसलमानांची दिशाभूल करत आहेत. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

२. आतापर्यंत मुसलमान आरक्षणासाठी कुठल्याच शासनाने ठोस पावले उचलली नाहीत. (केवळ मुसलमानांना झुकते माप देणार्‍या सच्चर आयोगाच्या काही शिफारशी लागू झाल्या आहेत. तसेच मुसलमानांसाठी वेगळ्या आरक्षणाची मागणी करून ओवैसी अन्य धर्मियांच्या संतापात भर घालत आहेत. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

३. आतापर्यंत मुसलमानांना आरक्षणाचे केवळ गाजर दाखवण्यात आले; मात्र केले काहीच नाही. आमच्या पक्षाने दलितांच्या अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासाठी महाराष्ट्रात प्रथम पाठिंबा दिला. (मतांच्या लांगूलचालनासाठी हा पाठिंबा आहे, हे जनता ओळखून आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

४. आपले सरकार आता शरीयतमध्ये हस्तक्षेप करत आहे. त्यामुळेच ‘तीन वेळा तलाक’चे सूत्र उपस्थित केले जात आहे. (सरकारला हे मान्य आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

रविवारी कराड येथे आठवड्याचा बाजार असतो; मात्र या सभेसाठी हिंदूंना बळजोरीने दुसरीकडे बसण्यास सांगितले जात होते. यामुळे हिंदु व्यावसायिक गल्ली-बोळातून त्यांची दुकाने थाटून त्रास सहन करत बसले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *