Menu Close

हिंदूंचा छळ चालूच राहिल्यास ३० वर्षांनी बांगलादेशात हिंदू रहाणार नाहीत ! – प्रा. अब्दुल बरकत

जे बांगलादेशातील एका मुसलमान प्राध्यापकाच्या लक्षात येते, ते भारतातील एकाही शासनकर्त्याच्या, लेखकाच्या आणि पत्रकाराच्या लक्षात येत नाही, हे लक्षात घ्या ! अखलाकच्या प्रकरणात मात्र हेच लेखक आणि पत्रकार पुरस्कार परत करण्यासाठी सर्वात पुढे होते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

professor_abul_barkat1
प्रा. अब्दुल बरकत

ढाका : धार्मिक अत्याचारांमुळे देश सोडून जाणार्‍या हिंदूंचे लोंढे चालूच राहिले, तर ३० वर्षांनी बांगलादेशात एकही हिंदु नागरिक नावाला शिल्लक रहाणार नाही, असा निष्कर्ष ढाका विद्यापिठातील प्रा. अब्दुल बरकत यांनी काढला आहे.

प्रा. अब्दुल बरकत यांनी पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ रिफॉर्मिंग अ‍ॅग्रीकल्चर, लॅण्ड अ‍ॅण्ड वॉटरबॉडिज इन बांगलादेश या पुस्तकात हा निष्कर्ष मांडल्याचे वृत्त ढाका ट्रिब्युन वृत्तपत्राने दिले आहे. या पुस्तकाचे १९ नोव्हेंबरला ढाका विद्यापिठात प्रकाशन झाले.

bangladesh_hindu

प्रा. बरकत यांनी मांडलेली सूत्रे

१. वर्ष १९६४ ते २०१३ या ४९ वर्षांत १ कोटी १३ लाख हिंदू धार्मिक छळवादाला कंटाळून अन्यत्र निघून गेले. म्हणजेच हिंदूंनी देश सोडून परागंदा होण्याचे प्रमाण वर्षाला २ लाख ३० सहस्र ६१२ एवढे होते.

२. वर्ष १९७१ मध्ये बांगलादेश स्वतंत्र झाल्यापासून जेव्हा जेव्हा सैनिकी राजवट राहिली, तेव्हा हिंदूंनी सर्वाधिक पलायन केले, असे दिसते.

३. मुक्ती संग्रामाच्या आधी हिंदूंनी बांगलादेश सोडून जाण्याचे दैनंदिन सरासरी प्रमाण ७०५ एवढे होते. वर्ष १९७१ ते १९८१ या दशकात ५१२, वर्ष १९८१ ते १९९१ या दशकात ४३८, वर्ष १९९१ ते २००० या दशकात ७६७ आणि वर्ष २००० ते २०१२ मध्ये ७७४ असे हे प्रमाण राहिले.

ढाका विद्यापिठातील ज्येष्ठ अध्यापक प्रा. अजय रॉय म्हणाले की, बांगलादेश स्वतंत्र होण्यापूर्वी पाक सरकारने हिंदूंची मालमत्ता शत्रूची मालमत्ता ठरवून बळकावली. स्वतंत्र बांगलादेशानेही नंतर सरकारजमा झालेली मालमत्ता म्हणून कह्यात ठेवली. सरकारच्या या दोन उपायांमुळे बांगलादेशातील ६० टक्के हिंदू भूमीहीन झाले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *