नागपूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनातील धर्माभिमान्यांची मागणी
नागपूर : केंद्र शासनाने इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (आयआरफ) वर ५ वर्षांची बंदी घालण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. त्याच जोडीला त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, विद्वेषी शिक्षण देणार्या पीस स्कूलवरही तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी येथे २२ नोव्हेंबर या दिवशी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात करण्यात आली. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. मंगला पागनीस, हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीकांत क्षीरसागर यांनीही मार्गदर्शन केले.
केंद्र शासनाने केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून हिंदुत्वनिष्ठांवर होणार्या आक्रमणांच्या प्रकरणांचा सखोल तपास करावा, कर्नाटक आणि केरळ राज्यातील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना संरक्षण पुरवण्याचे आदेश द्यावेत, तसेच धर्मांधांचे लांगूलचालन करणार्या ममता बॅनर्जी यांच्या शासनकाळात कायदा आणि सुव्यवस्था पायदळी तुडवली जात असल्याने त्यात केंद्र सरकारने त्वरित हस्तक्षेप करून बंगालमधील हिंदूंवर अत्याचार करणार्या धर्मांधांवर कारवाई करावी, हिंदूंचे संरक्षण करावे आणि हिंदूंना न्याय द्यावा, अशा विविध मागण्याही या वेळी करण्यात आल्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात