Menu Close

हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी करण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे ! – महेश कोठे, जिल्हाप्रमुख, शिवसेना, सोलापूर

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ४ डिसेंबरला सोलापूर येथे हिंदु धर्मजागृती सभा !

sunil_ghanavat
उजवीकडे शिवसेना जिल्हाप्रमुख महेश कोठे यांना सभेचे निमंत्रण देतांना श्री. सुनील घनवट

सोलापूर :  येथे ४ डिसेंबर २०१६ यादिवशी होणारी हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी करण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी कामाला लागावे, असे आदेश शिवसेनेचे येथील जिल्हाप्रमुख श्री. महेश कोठे यांनी दिले. ‘शिवसैनिकांचे हिंदु जनजागृती समितीला नेहमीच सहकार्य राहील’, असे आश्‍वासनही त्यांनी दिले. हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने धर्मसभेचे निमंत्रण देण्यासाठी त्यांची भेट घेतली. या वेळी ते बोलत होते. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट, विनोद रसाळ आणि हिरालाल तिवारी उपस्थित होते.

४ डिसेंबरला हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर सायंकाळी ५.३० वाजता हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

sunil_ghanavat-jpg2
बेडर समाजाचे अध्यक्ष श्री. सुनील कामठी श्री. सुनील घनवट (१) यांचा सत्कार करतांना

हिंदु धर्मजागृती सभेला खड्डा तालीमचे सर्व शिवसैनिक उपस्थित रहाणार ! – सुनील कामठी, शहर अध्यक्ष, बेडर समाज

‘धर्मसभेला खड्डा तालीमचे सर्व शिवसैनिक उपस्थित रहातील’, असे आश्‍वासन बेडर समाजाचे शहर अध्यक्ष सुनील कामठी यांनी दिले. समितीच्या वतीने त्यांना सभेचे निमंत्रण देण्यात आले. या वेळी ते बोलत होेते. त्यांनी समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यांनी प्रभागात धर्मजागृती सभेच्या प्रसारासाठी बैठकांचेही आयोजन केले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *