आमदारांकडून सकारात्मक प्रतिसाद
जळगाव : डिसेंबर २०१६ मध्ये होणार्या राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीने काही महत्त्वाचे प्रश्न विधानसभेत मांडण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील काही आमदारांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्या वेळी आमदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगावचे समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर आणि श्री. रवींद्र हेबाडे यांनी या भेटी घेतल्या.
१. मुक्ताईनगरचे आमदार आणि माजी महसूलमंत्री श्री. एकनाथ खडसे यांची भेट घेतल्यावर ते म्हणाले, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी या प्रकरणासमवेत मी माझे वैयक्तिक पत्र जोडून मी मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे. अजून काही विषय असतील, तर पाहू.
२. पाचोरा येथील शिवसेनेचे आमदार श्री. किशोर पाटील आणि चाळीसगाव येथील भाजपचे आमदार श्री. उन्मेष पाटील यांनी नगरपालिका निवडणुकीच्या काळातही सकारात्मक प्रतिसाद देत वरील प्रश्नांसाठी सर्वतोपरी साहाय्य करणार असल्याचे सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात