पाकमध्ये कायद्याला जुमानतात का ? त्यातही हिंदूंसाठी केलेल्या कायद्याला काही अर्थ असेल का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
कराची – पाकच्या सिंध प्रांतात अल्पसंख्याकांच्या विशेषतः हिंदूंच्या होणार्या धर्मांतराला रोख लावण्यासाठी कायदा करण्यात आला आहे. आता सिंधमध्ये धर्मांतर करणे गुन्हा मानला जाणार आहे. त्यासाठी कमीत कमी ५ वर्षाची, तसेच आजीवन कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तसेच ज्यांना धर्मांतर करायचे आहे, अशा लोकांना २१ दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यानंतरच त्यांना धर्मांतर करता येणार आहे. या कायद्यानुसार १८ वर्षाखालील तरुणांना धर्मांतर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा ऐतिहासिक निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया पाकमधील हिंदु खासदार नंद कुमार गोकलानी यांनी व्यक्त केली. सिंध प्रांतात सातत्याने होणार्या बळजोरीच्या धर्मांतराविरोधात अनेक संघटनांनी आंदोलने केली होती, त्यानंतर हा कायदा करण्यात आला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात