हुब्बळ्ळी : येथील श्रीमद् उज्जयनी श्री सिद्धलिंग जगद्गुरु पुराण कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘धर्मशिक्षण आणि धर्माचरण’ या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. या कार्यक्रमात १५० हून अधिक भाविक उपस्थित होते.
कार्यक्रमाला प्रार्थनेने प्रारंभ करण्यात आला. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कु. नागमणी आचार यांनी ‘धर्मशिक्षण आणि धर्माचरण’ याविषयीचे महत्त्व विशद केले. त्यानंतर त्यांनी नमस्काराच्या पद्धती आणि कृती यांविषयी माहिती दिली. वाढदिवस कसा साजरा करायचा, मंदिरात दर्शन कसे घ्यायचे यांविषयीच्या धार्मिक कृतीसंदर्भातही माहिती देण्यात आली. या वेळी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. उपस्थितांनी त्याचा लाभ घेतला.
क्षणचित्रे
१. कार्यक्रमात समितीच्या प्रवचनाला प्राधान्य देण्यात आले.
२. जवळच्या शिरथोला गावातून आलेले श्री. गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी धर्मशिक्षणाच्या माहितीने प्रभावित झाले. हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था चांगले कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.
३. श्री. मरुलसिद्ध शिवाचार्य स्वामी यांनी सनातनच्या कार्याला आशीर्वाद दिले आणि त्यांच्या कार्यक्रमात ग्रंथप्रदर्शन लावण्यासाठी निमंत्रण दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात