उज्जैन : आज पालक मुलांना धर्मशिक्षण आणि संस्कार यांचे महत्त्व न सांगता केवळ कॉन्व्हेंट पद्धतीचे शिक्षण देण्यासाठी आयुष्यभर कष्ट करतात, त्यांच्या वृद्धावस्थेत मुले मात्र परदेशात असतात; कारण त्यांना कॉन्व्हेंटमध्ये मातृ-पितृ ऋणाचे महत्त्वच शिकवले जात नाही. त्यामुळे आदर्श भावी पिढी घडवण्यासाठी शिक्षणाला धर्मशिक्षणाची जोडही द्यायला हवी.
‘विज्ञानामुळे प्रगती झाली’, असे एकांगी सांगणार्यांनी ‘आपण आता सुखी आहोत कि २५ वर्षांपूर्वी अधिक सुखी होतो’, असा प्रश्न स्वतःला करावा. या प्रश्नाच्या उत्तरातच धर्मशिक्षणाचे महत्त्व दडले आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केले. ते १८ नोव्हेंबरला आयोजित एका युवकांच्या बैठकीत बोलत होते.
येथील हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळाचे वाचक श्री. मनोज पटेल यांनी पुढाकार घेऊन या बैठकीचे आयोजन केले. या बैठकीला आसपासच्या ५० कि.मी. परिसरातून २० हून अधिक युवक उपस्थित होते.
श्री. शिंदे पुढे म्हणाले, ‘‘एकीकडे धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदु समाज आतून पोकळ होत आहे, तर दुसरीकडे अन्य पंथीय हिंदु धर्मावर विविध प्रकारे आक्रमण करत आहेत. आज ज्या सेंट झेवियरच्या कॉन्व्हेंट शाळेत मुलांना कौतुकाने पाठवले जाते, तो झेवियर एक क्रूरकर्मा होता, हे किती जणांना माहीत आहे ?
आज चर्चमधून पद्धतशीरपणे गोरगरीब हिंदूंच्या धर्मपरिवर्तनाचे कारस्थान चालू आहे. दुसरीकडे हिंदूंच्या धार्मिक स्थळावर धर्मांधांकडून आक्रमणे होत आहेत. काशी, मथुरा, अयोध्या येथील हिंदूंच्या पवित्र स्थळांवर आज मुसलमानांनी अतिक्रमण केले आहे.
आता उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या आसपास अशाप्रकारे अतिक्रमण चालू झाले आहे. याविषयी जागृती करण्यासह आपल्याला संघटित प्रयत्न करायला हवेत.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात