Menu Close

भारतीय सुरक्षा यंत्रणांना अवघ्या ६ आतंकवाद्यांनाही रोखता आले नाही – जैश-ए-महंमदने भारताची खिल्ली उडवली

भारतीय सैन्याने अझरसह त्याच्या पिलावळीला त्वरित धडा शिकवून त्यांना भारताची शक्ती दाखवून द्यावी ! – संपादक, हिंदुजागृती

मौलाना मसूद अजहर

इस्लामाबाद :  पठाणकोटमध्ये हल्ला चढवणाऱ्या केवळ सहा दहशतवाद्यांचा मुकाबलाही भारतीय सुरक्षा यंत्रणा करू शकल्या नाहीत, अशी खिल्ली उडवणारा ऑडिओ पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने www.alqalamionline.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. दहशतवाद्यांनी भारतीय सैन्य, गाड्या, रणगाडे आणि हेलिकॉप्टर्सवर कशा प्रकारे गोळीबार केला, याची माहितीही या व्हिडिओत दिली आहे. तसेच या संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अजहर याच्या बहावलपूर या शहरातून प्रसिद्ध होणाऱ्या एका उर्दू वृत्तपत्रात १३ मिनिटांच्या या ऑडिओबाबत मजकूर छापला आहे.

या हल्ल्याबाबत भारताने दिलेले पुरावे पाकिस्तान सरकारने स्वीकारू नयेत, अशी धमकी देत पाकिस्तानचे नेते भारताने केलेल्या आरोपांसमोर का झुकतात, असेही त्यात म्हटले आहे. या हल्ल्यात शहीद झालेले लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार आणि फतेह सिंह यांना क्रूरपणे मारल्याचे सांगून भारतीय सुरक्षा यंत्रणा ढिसाळ असल्याचेही त्यात म्हटले आहे. भारतानं पहिल्यांदा सहा दहशतवादी असल्याचे सांगितले. त्यानंतर पाच….मग चार…! देश अश्रूंच्या पुरात बुडाला आहे. तेथील (भारत) सरकार भित्रे असून, केवळ आरोप करत सुटले आहे, असेही या ऑडिओमध्ये म्हटले आहे.

संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *