मुंबई : २८ जून २०१६ या दिवशी निरीक्षण, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, साताराच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र (सातारा) या ट्रस्टविषयी अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालाद्वारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा विवेकवादाचा, पुरोगामित्त्वाचा आणि बुद्धीप्रामाण्यवादाचा बुरखा फाटला असून त्यांचा घोटाळेबाज चेहरा समाजासमोर आला आहे.
या प्रकरणी अधीक्षकांनी नमूद केलेल्या निरीक्षणांनुसार घोटाळेबाज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वर तात्काळ प्रशासक नेमावा आणि सनातन संस्थेने वारंवार सांगितल्यानुसार दाभोलकर यांच्या खुनाशी त्यांच्या न्यासामधील आर्थिक गैरव्यवहार कारणीभूत आहेत का ?, याची कसून चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भाजपचे आमदार श्री. सरदार तारासिंह, भाजपचे आमदार श्री. अशोक पाटील, शिवसेनेचे आमदार श्री. तुकाराम काते आणि शिवसेनेचे वरळी येथील विधानसभेचे आमदार श्री. सुनील शिंदे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना धर्माभिमानी कैलास वाघमोडे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री रमेश घाटकर, सतीश सोनार, उमेश गोडे, प्रसाद मानकर उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात