सोलापूर : संपूर्ण शक्तीनीशी संभाजी आरमारचे कार्यकर्ते येथे होणार्या हिंदु धर्मजागृती सभेत सहभागी होणार असून येथील धर्मजागृती सभेला पुष्कळ प्रमाणात उपस्थिती लाभण्यासाठी आमच्या १२५ शाखांमध्ये धर्मसभेला येण्याविषयी निमंत्रण पोचवू, असे आश्वासन सोलापूर येथील संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्री. श्रीकांत डांगे यांनी दिले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने त्यांना सभेचे निमंत्रण देण्यासाठी भेट घेतली असता ते बोलत होतेे. या वेळी समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्यसंघटक श्री. सुनील घनवट आणि श्री. हिरालाल तिवारी उपस्थित होते.
विडी घरकुल येथील महिला मेळावा
लव्ह जिहादच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी हिंदु महिला आणि मुलींनी धर्मशिक्षण घेण्याची आवश्यकता ! – सौ. अनिता बुणगे
आज हिंदु मुली लव्ह जिहादला बळी पडत आहेत. हे रोखण्यासाठी त्यांनी धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण केल्यास या समस्या उरणार नाहीत, असे प्रतिपादन रणरागिणी शाखेच्या सौ. अनिता बुणगे यांनी केले. सभेनिमित्त विडी घरकुल येथील समाज मंदिरात आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. मेळाव्याला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या मेळाव्याचे आयोजन श्री. सुधीर पेंडिले, विशाल येमुल आणि त्यांचे सहकारी यांनी केले. मेळाव्यापूर्वी आयोजकांची भेट घेऊन त्यांना धर्मसभेचे महत्त्व सांगण्यात आले. त्यातून प्रेरित होऊन त्यांनी मेळावा आयोजित केला. अन्य ठिकाणीही अशा स्वरूपाच्या मेळाव्यांच्या आयोजनासाठी ते प्रयत्नरत आहेत. मेळाव्याला ७५ महिला आणि २५ पुरुष उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. मेळाव्याचा प्रारंभ महिलांना कुंकू आणि पुरुषांना टिळा लावून झाला.
२. या वेळी धर्मशिक्षणवर्ग घेण्याची मागणी उपस्थितांकडून करण्यात आली.
सोलापूर येथे हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदु धर्मप्रेमी यांच्या वतीने ४ डिसेंबरला हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर सायंकाळी ५.३० वाजता हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. महिला मेळावे, बैठका आणि वैयक्तिक संपर्क यांच्या माध्यमातून प्रसारास वेग आला आहे. समाजातूनही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात