सांगली : इतिहासात टिपू सुलतानची क्रूरकर्मा म्हणून नोंद आहे. अशा हिंदुविरोधी आणि राष्ट्रविरोधी टिपू सुलतानचे उदात्तीकरण करण्याच्या उद्देशाने टिपूच्या जयंतीच्या निमित्ताने सांगली शहरातील खणभाग मधील नगारजी गल्ली येथे २५ नोव्हेंबर २०१६ या दिवशी सायंकाळी ६ ते ९.३० या कालावधीत आसिफभाई बावा युथ फाऊंडेशन हेल्प लाईन आणि समस्त मुस्लीम समाज, सांगली शहरच्या वतीने यांच्या हिंदुद्वेष्टे श्रीमंत कोकाटे यांच्या जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. तरी टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणारे सदरचे व्याख्यान रहित करावे, या मागणीसाठी समस्त हिंदुत्ववादी संघटनांनच्या वतीने २५ नोव्हेंबर या दिवशी पोलीस अधीक्षक श्री. दत्तात्रय शिंदे यांना निवेदन देण्यात आले. आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याने कोणालाही व्याख्यान घेऊ नका, असे सांगता येत नाही; मात्र अयोग्य व्यक्तव्य होऊ नये यांसाठी योग्य ती कृती करू, असे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी हिंदुत्वववाद्यांना दिले. (अफझलखान वधाचे चित्र लावण्यास विरोध करतांना, पोलिसांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवत नाही का ? इतरत्रच्याही हिंदुत्ववाद्यांनी यातून दखल घेऊन अन्य ठिकाणाही टिपूचे होत असलेले उदात्तीकरण रोखले पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या वेळी पुरोहित संघाचे सर्वश्री अनंत कुलकर्णी, भास्कर जोशी, शिवसेनेचे उपशहरप्रमुख श्री. नितीन काळे, माजी उपशहरप्रमुख श्री. हरिदास पडळकर, श्री. विजय गडदे, श्री. अरुण गुंढे, हिंदु एकता आंदोलनाचे युवा सेनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. अभिजित शिंदे, हिंदु धर्माभिमानी सर्वश्री अरुण पाटील, विनायक बुटाले, श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. सचिन पवार, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री दत्तात्रय रेठरेकर आणि श्री. संतोष देसाई उपस्थित होते.
आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांचा निवेदन स्वीकारल्यावर तात्काळ सकारात्मक प्रतिसाद
पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन झाल्यावर सर्व हिंदुत्वववाद्यांनी भाजपचे आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांना निवेदन दिले. निवेदन स्वीकारल्यावर आमदार श्री. गाडगीळ यांनी तात्काळ प्रतिसाद देत पोलीस अधीक्षकांना दूरभाष करून कोणतेही अयोग्य वक्तव्य न होण्याविषयी संयोजकांना नोटीस देण्याविषयी सांगितले.
निवेदनातील काही मजकूर….
१. टिपूच्या हातात सत्ता येताच त्याने मूळच्या हिंदु राजाचे नाव-गाव पुसून टाकले. म्हैसूर हे इस्लामी राज्य असल्याचे घोषित केले. सर्व हिंदु स्त्री-पुरुषांना मुसलमान धर्माची दिक्षा द्या, जे स्वेच्छेने मुसलमान धर्माचा स्वीकार करणार नाही, त्यांना बळजोरीने मुसलमान करा अथवा ठार मारा. हिंदु महिलांना पकडून आणा आणि बटीक करून सर्व मुसलमानांमध्ये वाटून टाका, असा आदेश काढला. टिपूच्या सैन्याने ८ सहस्रपेक्षा अधिक देवळे नष्ट केली. याचप्रकारे टिपूची माणसे सरसकट गोहत्या करायचे, एवढेच नव्हे, तर देवळातील मूर्तींची तोडफोड करून त्याच ठिकाणी गोहत्या करायचे आणि नंतर तिथे मशीद बांधायचे. त्यामुळे क्रूरकर्मा टिपूच्या जयंतीच्या निमित्ताने व्याख्यानाचे आयोजन म्हणजे हिंदूंच्या धर्मभावनांवर मीठ चोळल्यासारखे होईल.
२. श्रीमंत कोकाटे यांनी आतापर्यंत यापूर्वी ठिकठिकाणी झालेल्या कार्यक्रमात केवळ एका विशिष्ट समाजाच्या विरोधात वक्तव्य करून जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण केली आहे. कोकाटे यांचा पूर्वइतिहास पहाता आजपर्यंत त्यांनी प्रत्येक कार्यक्रमातून हिंदु धर्म, देवता, राष्ट्रपुरुष, संत, ब्राह्मण यांच्या विरोधात प्रत्येक कार्यक्रमांतून विद्वेष पसरवणारी आणि गरळ ओकणारी वक्तव्ये केली आहेत. सतत ब्राह्मणद्वेष आणि हिंदुद्वेष करणार्या कोकाटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा असत्य इतिहास व्याख्यान, पुस्तक, लिखाण यांमधून लोकांसमोर मांडला आहे. त्यामुळे अशा श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान रहित करण्यात यावे, अशी मागणी आम्ही करत आहोत.
पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचा पोलीस अधीक्षकांना दूरभाष
हा विषय श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना समजल्यावर त्यांनी लगेच पोलीस अधीक्षकांना दूरभाष करून या संदर्भात जातीने लक्ष घालण्यास सांगितले. (हिंदुत्वविरोधी कार्यक्रम रहित होण्यासाठी पोलीस अधीक्षकांना दूरभाष करणारे पू. संभाजीराव भिडेगुरुजी हे इतरांसाठी आदर्श असेच आहेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात