Menu Close

डीएजी मॉडर्न (मुंबई) : चित्रप्रदर्शनातील म.फि. हुसेन यांच्या चित्रांच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीकडून पोलीस ठाण्यात तक्रार !

  • तक्रार घेण्यास प्रारंभी पोलिसांकडून टाळाटाळ !

  • धर्माभिमान्याला पोलीस ठाण्यात पाऊण घंटा ताटकळत ठेवले !

तक्रारदाराची तक्रार प्रविष्ट न करता त्याला ताटकळत ठेवणे म्हणजे तक्रारदाराला नाहक दिलेली ही शिक्षा आहे. अशा पोलिसांविषयी
त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करणे आवश्यक आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

mf_husain320मुंबई : फोर्ट, काळा घोडा मार्ग येथील डीएजी मॉडर्न येथील २० व्या शतकातील भारतीय कला या नावाने हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाच्या विरोधात २६ नोव्हेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. ही तक्रार प्रविष्ट करण्यासाठी गेलेले हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद मानकर यांना कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार न स्वीकारता पोलिसांनी पाऊण घंटा ताटकळत ठेवले. तक्रार देतांना श्री शिवकार्य प्रतिष्ठान (विक्रोळी)चे अध्यक्ष श्री. प्रभाकर भोसले हेसुद्धा उपस्थित होते. अखेरीस माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून घेण्यात आली. येथील पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी म.फि. हुसेन यांच्या चित्रांवर कारवाई केल्यास तुमच्यासमोर झुकल्यासारखे होईल, असे सांगून प्रारंभी प्रतिसाद देण्याचे टाळले. (कुणाच्या हुजरेगिरीसाठी नव्हे, तर जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी खाकी वर्दी आहे, हे सामान्यज्ञानही नसलेले पोलीस ! अशा प्रकारची भाषा वापरणार्‍या पोलिसांविषयी जनतेला कधीतरी आपुलकी वाटेल का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) म.फि. हुसेन यांनी काढलेले भारतमातेचे नग्न चित्र आणि हिंदूंच्या देवतांची अश्‍लील चित्रे यांविषयी माहिती दिल्यावर पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धोपावकर बाहेर गेले आहेत, अर्ध्या घंट्यानंतर येतील. आल्यावर त्यांच्याशी बोला, असे खोटे सांगितले. प्रत्यक्षात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धोपावकर आतल्या खोलीत विश्रांती घेत होते. ते पाऊण घंट्याने बाहेर आले. धर्माभिमान्यांना पोलिसांचा खोटेपणा लक्षात आल्यावर पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी आदल्या रात्री कामामुळे झालेल्या जागरणामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रांती घेत असल्याचे सांगितले. (खोटारडे पोलीस ! जनतेशी खोटे बोलणारे पोलीस जनतेला न्याय काय देणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या वेळी धर्माभिमान्यांनी वरिष्ठ अधिकारी आतच होते, हे त्याच वेळी सांगितले असते, तर आम्ही थांबून राहिलो नसतो, असे सांगितले. त्यावर आमच्यावर कामाचा प्रचंड ताण असतो, असे सांगितले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धोपावकर यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी डीएजी मॉडर्न आमच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत नाही, असे सांगून माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. (हिंदूंच्या देवतांची अश्‍लील चित्रे काढणार्‍या कलाकाराच्या चित्रांच्या प्रदर्शनावर कारवाई न करणार्‍या पोलिसांनी अन्य धर्मियांविषयी अशीच सूचना केली असती का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

धर्माभिमान्यांसोबत घटनास्थळी जाऊन पोलिसांनी माहिती घेतली; मात्र कारवाई करण्यास टाळाटाळ !

माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात धर्माभिमानी तक्रार नोंदवण्यासाठी गेले असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखलाल वर्पे यांनी म.फि. हुसेन यांची चित्रे प्रदर्शनात न लावण्याविषयी तुमच्याकडे न्यायालयाच्या आदेशाची प्रत आहे का ?, असे दरडावून विचारले. यावर धर्माभिमान्यांनी दरडावून विचारण्याचे कारण विचारले असता, त्यानंतर त्यांनी विषय समजून घेतला. (कसे वागायचे याचेही ज्ञान नसलेले पोलीस ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखलाल वर्पे यांनी २ पोलीस अधिकार्‍यांना धर्माभिमान्यांसोबत डीएजी मॉडर्न येथे व्यवस्थापकांना भेटण्यासाठी पाठवले. या ठिकाणी पोलिसांनी आतमध्ये जाऊन डीएजी मॉडर्नच्या व्यवस्थापकांसोबत चर्चा केली. त्यानंतर पोलिसांसोबत बाहेर येऊन व्यवस्थापकांनी याविषयी पर्यायी मार्ग निघतो का ? हे पडताळून तुम्हाला कळवतो, असे धर्माभिमान्यांना सांगून वेळ मारून नेली; मात्र तेथून पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार प्रविष्ट करून घेतली. (हिंदू सहिष्णु असल्याने पोलीस एवढा वेळकाढूपणा करतात का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *