हुबळी : (अंध)श्रद्धा निर्मूलन कायद्याच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांनी येथील प्रसिद्ध सांगोली रायण्णा चौकात २३ नोव्हेंबरला तीव्र आंदोलन केले. या वेळी बोलतांना धर्माभिमानी श्री. दयानंद राव यांनी हिंदु संस्कृती नष्ट करण्यासाठी काँग्रेसची स्थापना झाल्याचे सांगितले. या कायद्यावर बंदी घातली नाही, तर हिंदु संस्कृती लोप पावेल, असेही ते म्हणाले. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. विदुला हळदीपूर यांनी राज्य सरकार हिंदुविरोधी धोरण अवलंबत असल्याचा आरोप केला. या वेळी श्रीराम सेनेचे हुबळीचे अध्यक्ष श्री. गणेश कदम, श्री. मोहन गुरुस्वामी (अय्यप्पा वृंद) यांच्यासह मोठ्या प्रमाणात हिंदु धर्माभिमानी सहभागी झाले होते.
आंदोलनातील मागण्या
१. दक्षिण भारतात होणार्या हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांच्या प्रकरणांची केंद्रीय अन्वेषण विभागाच्या मार्फत चौकशी करण्यात यावी.
२. इस्लामी प्रचारक डॉ. झाकीर नाईक यांनी स्थापन केलेले इस्लामिक रिसर्च फाऊन्डेशन आणि पीस इंटरनॅशनल स्कूल यांवर बंदी घालावी.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात