संयुक्त राष्ट्र संघाला पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंचा होत असलेला वंशसंहार एवढ्या वर्षांत का दिसला नाही ? काश्मीरमध्ये हिंदूंचा झालेला वंशसंहार कसा दिसला नाही ? त्यांना केवळ रोहिंग्या मुसलमानांचा वंशसंहार कसा दिसतो ? – संपादक, हिंदुजागृति
टेकनॅफ (बांगलादेश) – म्यानमारमधून रोहिंग्या मुसलमानांचा वंशसंहार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तेथे रोहिंग्या मुसलमानांशी मोठ्या प्रमाणात भेदभाव आणि दुर्व्यवहार केला जात आहे. त्यांच्या महिलांवर सामूहिक बलात्कार करण्याबरोबर हिंसाचार आणि हत्या यांतही वाढ झाली आहे, असा आरोप संयुक्त राष्ट्रांकडून करण्यात आला आहे.
बांगलादेशच्या सीमेवरील शहर कॉक्स बाजारमधील संयुक्त राष्टांच्या शरणार्थी साहाय्यता यंत्रणेचे प्रमुख जॉन मॅककिसिस्क यांनी सांगितले की, म्यानमारचे सैन्य रोहिंग्या पुरुषांची गोळ्या झाडून हत्या करत आहे. मुलांनाही ठार केले जात आहे. महिलांवर बलात्कार केले जात आहेत. त्यांच्या घरांना लुटून आग लावण्यात येत आहे. त्यामुळे सहस्रो रोहिंग्या बांगलादेशमध्ये पळून येत आहेत.
बांगलादेश सरकारने या मुसलमानांना शरण देण्यासाठी सीमा उघडी केली आहे. याचा आंतरराष्ट्रीय स्तरावरून विरोध केला जात आहे. यावर मॅककिसिस्क यांनी म्हटले की, अशामुळे म्यानमार अजून अत्याचार करील आणि त्यांना बांगलादेमध्ये पळून जाण्यास भाग पाडील. हे तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत सर्व रोहिंग्या तेथून पळून जात नाहीत. म्यानमारच्या राखिन प्रांतातील हिंसाचारानंतर शेकडो मुसलमानांनी देश सोडून बांगलादेशमध्ये शरण घेतली आहे. आतापर्यंत ३० सहस्रांहून अधिक मुसलमानांनी पलायन केले आहे.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात