Menu Close

बांगलादेशातील धर्मांधांपासून हिंदूंचे रक्षण करण्याची ट्रम्प यांच्याकडे मागणी !

न्यूयॉर्कमधील ट्रम्प टॉवरच्या बाहेर बांगलादेशी हिंदूंचे आंदोलन !

अमेरिकेतील बांगलादेशी हिंदू बहुसंख्य हिंदूंचे प्रतिनिधित्व करणार्‍या भारत सरकारकडे नव्हे, तर ट्रम्प यांच्याकडे ही मागणी करतात ! याचा अर्थ भारत शासन नव्हे, तर ट्रम्प त्यांचे रक्षण करतील, याचा त्यांना विश्‍वास आहे !

donald_trump

न्यूयॉर्क – अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या येथील ट्रम्प टॉवर या इमारतीबाहेर बांगलादेशी हिंदूंनी २७ नोव्हेंबरला आंदोलन केले. बांगलादेशात हिंदूंवर जिहाद्यांकडून होणारे अत्याचार रोखण्यासाठी ट्रम्प यांच्याकडे या आंदोलनाद्वारे मागणी करण्यात आली. आंदोलनाचे आयोजन येथील बांगलादेशी वंशाच्या हिंदूंनी केले होते. आंदोलनानंतर ट्रम्प यांना निवेदन देण्यात आले. यात दिवाळीच्या वेळी बांगलादेशमधील ब्राह्मणबरीया आणि संताल येथील हिंदूंवरील आक्रमणाचा उल्लेख करण्यात आला आहे.

आंदोलनाच्या आयोजकांपैकी एक असणारे सितांग्शु गुहा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, आम्ही ट्रम्प यांना मतदान केले आहे आणि आम्ही त्यांना सांगू इच्छितो की, बांगलादेशमध्ये सातत्याने हिंदू आणि अन्य अल्पसंख्यांक यांवर अत्याचार होत आहेत. ते थांबवले जात नाहीत. आम्हाला वाटते की, ट्रम्प यांनी कार्यभार स्वीकारताच याविषयी पाऊल उचलावे.

आता काश्मीर, उत्तरप्रदेश, आसाम, बंगाल, केरळ आदी राज्यांतील धर्मांधांकडून पीडित हिंदूंनीही ट्रम्प यांच्याकडे त्यांचे रक्षण करण्याची मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *