Menu Close

बरेली (उत्तरप्रदेश) येथे उरूसच्या मिरवणुकीला हिंदूंच्या वस्तीतून नेण्यास विरोध करणार्‍या हिंदूंवर धर्मांधांची दगडफेक !

उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्षाच्या राज्यात हिंदूंची स्थिती काश्मीरच्या हिंदूंप्रमाणे झाली आहे ! केंद्रातील सरकारही त्याकडे पूर्वीच्या काँग्रेस सरकारप्रमाणेच दुर्लक्ष करत आहे, यासाठी हिंदु राष्ट्राचीच आवश्यकता आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

बरेली (उत्तरप्रदेश) – येथे आला हजरत यांच्या उरूसमध्ये चादर चढवण्यासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीचा नेहमीचा मार्ग पालटून ती हिंदूंच्या वस्तीतून काढण्याला आणि डिजे वाजवण्याला हिंदूंनी विरोध केल्यावर धर्मांधांकडून त्यांच्यावर दगडफेक करण्याची घटना घडली. प्रथम हिंदूंनी विरोध केल्यावर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर मिरवणुकीचा नेहमीचा मार्ग अवलंबण्यात आला होता; मात्र त्या मार्गाच्या अर्ध्या वाटेत चिखल असल्याचे ती पुन्हा हिंदूंच्या वस्तीतून नेण्यात आल्यावर त्याला हिंदूंनी विरोध केल्यावर त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. यात काही जण घायाळ झाले. त्यातील काहींना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

पोलिसांनी ११ व्यक्ती आणि ४० अज्ञात यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट केला. या प्रकरणी प्रधान कृष्णपाल यादव यांच्यासहित ७ जणांना अटक करण्यात आली. सध्या येथे पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. (दगडफेक करणार्‍या धर्मांधांना अटक करण्याऐवजी हिंदूंनाच अटक करणारे उत्तरप्रदेशातील हिंदुद्वेषी पोलीस ! – संपादक)

स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *