देशी गायीच्या दुधात अनेक रोगांना समूळ नष्ट करण्याची क्षमता !
मेरठ : जगभरात दुधाच्या शुद्धतेसाठी आदर्श असलेल्या भारतीय दुधाळू संपदेला ग्रहण लागले आहे. देशी गायींच्या अनेक जाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. सिंथेटिक दुधाचा वापर, हिरव्या चार्याची कमतरता आणि पशूवध यांमुळे त्यांच्या पोषणाची गंगा आटत चालली आहे. दुध वाढवण्याच्या लोभापायी भारतीय आणि विदेशी जातींचे गोवंश यांच्यात क्रॉस ब्रीड करण्यात येत आहे. त्यामुळे अमृतावरच अन्याय होत आहे. न्युझीलंडमध्ये प्राध्यापक डॉ. वुडफोर्ड यांनी त्यांच्या शोधपत्रात स्पष्ट केले आहे की, भारताच्या सर्व गायींमध्ये बीटा कॅसिन-२ आढळून येते, ज्यात शरीरस्वास्थ्य आणि बुद्धीवर्धक सर्वच गुणधर्म आहेत. त्यात अनेक रोगांना समूळ नष्ट करण्याची क्षमता वैज्ञानिक आधारे सिद्ध झाली आहे.
भारतीय गोवंशाची निर्मिती समुद्रमंथनातून !
वैदिक मान्यतेनुुसार भारतीय गोवंश समुद्रमंथनातून निर्माण झाला आहे. त्यामुळे तो जंगली प्रवृत्तीपासून लांब राहिला आहे. भारतीय गोवंशाच्या दुधाची गुणवत्ता वैज्ञानिक दृष्टीकोनातूनही सिद्ध झाली आहे. न्यूझीलंडचे डॉ. कीथ वुडफोर्ड यांनी संशोधनाअंती काढलेल्या निष्कर्षानुसार प्राचीन काळी युरोपीय जातीच्या गायींमध्ये म्युटेशन असल्यामुळे दुधात विषारी प्रोटीन निर्माण होणे चालू झाले. भारतीय जातीच्या गायींमध्ये म्युटेशन नसल्यामुळे दुधाची गुणवत्ता टिकून राहिली.
अमेरिकेत लावण्यात आलेल्या शोधानुसार विदेशी जातींच्या गायींमध्ये बीटा कॅसिन-ए नावाचा दुग्ध प्रोटीन आढळून येतो, जो विषारी समजला जातो. या दुधाच्या प्रोटीनमुळे पचनाच्या प्रक्रियेत बाधा निर्माण होते. ते पचनाच्या पूर्वीच रक्तप्रवाहात मिसळते. त्यामुळे हृदयरोग, मधुमेह, स्कीजोफ्रेनिया, तसेच अनेक जीवघेणे आजार होण्याची शक्यता असते.
गायीच्या दुधात स्वर्णभस्म निर्माण होते !
भारतीय पशूंच्या जाती नेहमीच कौतुकास्पद राहिल्या आहेत. गोवंशाच्या मुत्रात रेडिओलहरी शोषून घेण्याची क्षमता आढळून येते. भोपाळ वायूदुर्घटनेच्या वेळी शेणाने सारवलेल्या घरांवर वायूगळतीचा परिणाम अल्प झाल्याचे सिद्ध झाले आहे. गायीच्या दुधात स्वर्णभस्मही निर्माण होते. मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियानेही गायीच्या दुधाला सर्वोत्तम म्हटले आहे. गायीचे तूप ग्रहण केल्याने कोलेस्ट्रॉल वाढत नाही. – डॉ. डी.के. सधाना, पशु शास्त्रज्ञ, एन्डीआरआय, करनाल
देशी गायीच्या दुधापासून बनलेल्या दह्यात असा विषाणू असतो, ज्यात एड्सविरोधी गुणधर्म असतो. भारतीय जलवायूच्या विविधतेमुळेही दुधाची गुणवत्ता वाढते. – डॉ. मनोज तोमर, शास्त्रज्ञ, जिल्हा विज्ञान केंद्र
भारतात देशी गायींविषयी उदासीनता !
१. पश्चिम उत्तरप्रदेशमध्ये गाय आणि म्हशी यांच्या तुलनेत गायींची संख्या ६० टक्के आहे, जी काळानुसार अल्प होत आहे.
२. पशूपालनाविषयी उदासीनता आणि अंदाधुंद गोहत्या यांमुळे देशात देशी गायी अल्प होत आहेत.
३. जगात सर्वोत्तम जातीच्या गिर गायीची संख्या सौराष्ट्रात १० सहस्रांहूनही अल्प आहे; परंतु ब्राझिलमध्ये या गायी सर्वाधिक आहेत.
४. अनेक कृषी विद्यापिठांमध्ये साहीवाल, गिर, थारपारकर, अंगोल आणि राठी यांसह उत्तम जातीच्या गायींचे विभाग चालू करण्यात आले आहेत; परंतु विदेशी अनुदानासाठी क्रॉस ब्रीडला प्रोत्साहन देण्यात येत आहे.
५. जगभरात २५० गायींच्या जातीमध्ये ३२ जाती भारतीय गोवंशांच्या आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात