Menu Close

..तर काश्मीरमधून आतंकवादी आणि देशद्रोही यांचे अस्तित्व नष्ट होईल ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

भारत रक्षा मंचाच्या तिरंगा यात्रेद्वारे उज्जैनमध्ये जनजागृती

ramesh_shinde_ujjain
जनजागृती यात्रेला संबोधित करतांना श्री. रमेश शिंदे

उज्जैन : काश्मीरचे हिंदू आता एकटे नाहीत, त्यांच्या सोबत देशातील १०० कोटी हिंदू आहेत. आज अमरनाथच्या यात्रेला हिंदूंची एवढी गर्दी होते, उद्या सर्व हिंदूंनी अमरनाथकडे कूच केले, तर काश्मीरमधून आतंकवादी आणि देशद्रोही यांचे अस्तित्व नष्ट होईल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केले.

देशात बांगलादेशी घुसखारी थांबवण्यासाठी आणि काश्मिरी हिंदूंचे पूनर्वसन करण्यासाठी भारत रक्षा मंचाच्या वतीने तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेच्या निमित्ताने उज्जैन येथे जनजागृतीसाठी नुकतीच एक वाहन फेरी काढण्यात आली या वाहन फेरीचा प्रारंभ नागझिरी येथून होऊन कंठाल येथे समारोप करण्यात आला. या वेळी श्री. शिंदे बोलत होते. यात्रेचा प्रारंभ ग्वाल्हेरपासून झाला असून समारोप २७ नोव्हेंबरला शहीद भवन, भोपाळ येथे होणार आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *