सांगली येथे क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी करून उदात्तीकरण !
-
संघाने दंगली घडवल्या असत्या, तर कोकाटे यांनी असे बोलण्याचे धाडस केले असते का ?
-
दंगली कोण घडवते, हे उघड असतांना धादांत खोटी विधाने करून समाजात फूट पाडू पहाणारे कोकाटे !
सांगली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशात दंगली घडवणारी संघटना आहे. संविधान, आरक्षण आणि लोकशाही त्यांना मान्य नाही. देश पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी चालवत नाहीत, तर संघाचे मोहन भागवत चालवत आहेत, अशी मुक्ताफळे श्रीमंत कोकाटे यांनी उधळली. (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशात दंगली घडवणारी संघटना आहे, असे कोकाटे म्हणत असतील, तर तसे पुरावे त्यांनी दिले पाहिजेत. राष्ट्र आणि समाज कार्य करणार्या संघाने देशभक्त नागरिक सिद्ध केले आहेत. याउलट देशात धर्मांधच सर्वत्र दंगली घडवत असल्याचे सर्वत्र ढळढळीत पुरावे असतांना अशी दिशाभूल करणारी वक्तव्य करणे म्हणजे हा समाजात दूही माजवण्याचाच प्रकार आहे. अशांवर पोलिसांनी आता कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
टिपू सुलतानच्या जयंतीच्या निमित्ताने सांगली शहरातील खणभागमधील नगारजी गल्ली येथे २५ नोव्हेंबर या दिवशी आसिफभाई बावा युथ फाऊंडेशन हेल्प लाईन आणि समस्त मुस्लीम समाज, सांगली शहर यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात कोकाटे बोलत होते. (जे लोक राष्ट्रविरोधी आणि हिंदुविरोधी टिपू सुलतान यांची जयंती आयोजित करतात, ते लोक समाजात फूट पाडण्याचे काम करत आहेत. अशा लोकांवर पोलीस प्रशासनाने आपणहून कारवाई केली पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
या वेळी कोकाटे म्हणाले,
१. टिपू सुलतान हिंदुविरोधी नव्हते, त्यांच्या सैन्यात बहुजन होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे त्यांचाही खोटा इतिहास सांगितला जातो. हिंदु-मुसलमान समाजात अपसमज पसरवण्यासाठी हे कारस्थान आहे. (टिपूच्या हातात सत्ता येताच त्याने मूळच्या हिंदु राजाचे नाव-गाव पुसून टाकले. म्हैसूर हे इस्लामी राज्य असल्याचे घोषित केले. सर्व हिंदु स्त्री-पुरुषांना मुसलमान धर्माची दीक्षा द्या, जे स्वेच्छेने मुसलमान धर्माचा स्वीकार करणार नाही, त्यांना बळजोरीने मुसलमान करा अथवा ठार मारा. हिंदु महिलांना पकडून आणा आणि बटीक करून सर्व मुसलमानांमध्ये वाटून टाका, असा आदेश काढला. टिपूच्या सैन्याने ८ सहस्रांपेक्षा अधिक देवळे नष्ट केली. असा क्रूरकर्मा टिपू हिंदुविरोधी नव्हता, असे म्हणणे म्हणजे जाणीवपूर्वक टिपूचे उदात्तीकरण करणे होय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. रा.स्व. संघापासून संविधान आणि लोकशाही यांना धोका आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची लढाई राजकीय होती. त्यांचा संघर्ष मुसलमानांशी नव्हता, तो ब्राह्यण्यवादविरोधात लढा होता. (ब्राह्मणद्वेषी कोकाटे ! पाच पातशाह्यांशी लढणारे छत्रपती शिवाजी महाराज हे गो-ब्राह्मण प्रतिपालक होते. असे असतांना छत्रपती शिवाजी महाराजांचा असत्य इतिहास मांडून कोकाटे हे जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करत आहेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. दंगल करून किंवा घडवून देशाचे प्रश्न सुटत नाहीत. टिपू सुलतान हा वंशाने झालेला राजा नव्हता. त्याचे वडील हैदरअली सामान्य कुटुंबातून स्वकर्तृत्वावर पुढे आले. टिपूचे अनेक भाषांवर प्रभूत्व होते आणि ते तत्त्वज्ञानी-लेखक होते. (गोबेल्सनीती आणि उदात्तीकरणाचा अतिरेक म्हणतात, ते यालाच ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
क्षणचित्रे
१. या कार्यक्रमात कोकाटे काय बोलतात, हे ऐकण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांचे काही कार्यकर्ते कार्यक्रमस्थळी गेली होते; मात्र पोलिसांना त्यांना कार्यक्रमस्थळी सोडले नाही. कार्यक्रमस्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (वक्त्याचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य जपणारे पोलीस हिंदुत्वनिष्ठांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर का घाला घालतात ? असे करून पोलीस एक प्रकारे कोकाटे यांना पाठीशीच घालत आहेत, नव्हे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणारे सदरचे व्याख्यान रहित करावे, या मागणीसाठी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनच्या वतीने २५ नोव्हेंबर या दिवशी पोलीस अधीक्षक श्री. दत्तात्रय शिंदे यांना निवेदन देण्यात आले; मात्र निवेदन दिल्यानंतरही व्याख्यानात टिपूचे उदात्तीकरण करण्यात आले. (कोकाटे यांचा पूर्वेतिहास पहाता त्यांनी प्रत्येक कार्यक्रमातून हिंदु धर्म, देवता, राष्ट्रपुरुष, संत, ब्राह्मण यांच्या विरोधात विद्वेष पसरवणारीच वक्तव्ये केली आहेत. अशांची व्याख्याने रहित करण्याऐवजी ती पोलीस बंदोबस्तात चालवू देणारे पोलीस भारताचे कि पाकचे ? अशा पोलिसांवर शासन कारवाई करणार का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात