Menu Close

घोटाळेबाज अंनिसवर बंदी घालण्याच्या संदर्भात अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांना निवेदन

girish_bapat
श्री. गिरीश बापट (उजवीकडे) यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते

पुणे :  अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली समाजाला नास्तिकतेकडे नेणार्‍या अंनिसचा भ्रष्ट चेहरा सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, तसेच हिंदु विधीज्ञ परिषद यांनी उघडा पाडला होता. अंनिसविरोधात करण्यात आलेल्या तक्रारींची नोंद घेत सातारा येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या अधीक्षकांनी चौकशी अहवालामध्ये अंनिसवरील आर्थिक घोटाळ्यांच्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे नमूद करून अंनिसवर प्रशासक नेमावा असे सूचित केले होते. नुकतेच केंद्रीय गृहमंत्रालयानेही अंनिसची एफ्सीआर्ए नोंदणी रहित केली होती. या पार्श्‍वभूमीवर घोटाळेबाज अंनिसची सखोल चौकशी करून बंदी घालण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन अन्न आणि नागरी पुरवठामंत्री, तसेच पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना देण्यात आले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री दीपक आगवणे आणि गजानन केसकर उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *