या उदाहरणावरून ही लव-जिहाद ची घटना आहे, असे लोकांना वाटल्यास आश्चर्य ते काय ? – संपादक, हिंदुजागृति
अहमदाबाद – गुजरात उच्च न्यायालयाने लिव्ह इन रिलेशनशिपसंदर्भात आज ऐतिहासिक असा निर्णय दिला आहे. एका १९ वर्षीय हिंदू मुलीला २० वर्षीय मुसलमान प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे. या दोघांचे शाळेपासून एकमेकांवर प्रेम आहे. मात्र वयाच्या कारणास्तव दोघांना लग्न करता येत नव्हते.
मुलगी बनासकाठा जिल्ह्यातील धनेडा गावात राहायला आहे. न्यायमूर्ती अकील कुरेशी आणि न्यायमूर्ती बीरेन वैष्णव यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. आमचा समाज लग्न आणि त्याच्या पावित्र्यावर फारच दबाव टाकत असतो. लिव्ह इन रिलेशनशिपची जास्त प्रकरणे ही मेट्रो शहरांतूनच येतात. दरम्यान कायद्याने प्रेम करणा-या व्यक्तींना रोखता येणार नाही, असे न्यायमूर्तींनी सुनावणीदरम्यान सांगितले.
विशेष म्हणजे मुलगा आणि मुलगी एकाच शाळेत अभ्यासाचे धडे गिरवत होते. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळून आले. दोघांमधून कोणीही स्वतःचा धर्म बदलण्यासाठी तयार नव्हते. मुलगी १८ वर्षांपेक्षा जास्त वयाची असली तरी मुलगा २१ वर्षांचा नाही. तरीही त्या दोघांनी जुलैमध्ये मैत्री करार केला. मुलीचे नातेवाईक जोरजबरदस्तीने मुलीला घेऊन गेले. मात्र त्यानंतर प्रियकर मुलाने न्यायालयाचा कोर्टाचा दरवाजा ठोठावला. त्याने न्यायालयात सांगितले की, माझ्या प्रेयसीला तिच्या इच्छेविरुद्ध नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्यानंतर पोलिसांनी त्या मुलीला न्यायालयात हजर केले. त्यावेळी मुलीने आई-वडिलांसोबत न राहता मी प्रियकरासोबत लग्न करू इच्छिते, असे सांगितले. (हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे वशीकरण केल्याचे हे उदाहरण नव्हें काय? – संपादक,हिंदुजागृति) त्यामुळे स्पेशल मॅरेज अॅक्टअंतर्गत त्यांचं रजिस्टर पद्धतीने लग्न लावून देण्याचे न्यायालयाने सुचवले असून, न्यायालयाने एफिडेव्हिट दाखल करून घेतले आहे. त्या एफिडेव्हिटमध्ये मुलगा २१ वर्षांच्या झाल्यानंतर तो लग्न करू शकतो, असे नमूद केले आहे.
स्त्रोत : लोकमत