नवी देहली – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत अव्वल ठरलेल्या टीना दाबी आणि अतहर आमिर उल शफी खान यांच्या लग्न करण्याच्या निर्णयावर हिंदू महासभाने आक्षेप घेतला आहे. अतहर आमिर खानचे टीना दाबीबरोबरील लग्न म्हणजे भारतात सुरू असलेल्या लव्ह जिहादचा हा प्रकार असल्याचा आरोप हिंदू महासभेचे राष्ट्रीय सचिव मुन्ना कुमार शर्मा यांनी केला आहे. कट्टरपंथी मुस्लिमांकडून भारताला इस्लाम राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा करत टीनाच्या आई-वडिलांनी यासंबंधी टीनाला योग्य मार्गदर्शन करण्याची आवश्यकता असल्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.
टीना दाबीने वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी यूपीएससी परीक्षेत अव्वल येण्याचा मान मिळवला होता. तर अतहर आमिर खान हा द्वितीय आला होता.
हिंदू महासभेचे प्रतिनिधी लवकरच टीना दाबीच्या कुटुंबियांची भेट घेऊन योग्य ते सल्ला देणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले. लग्न थांबवणे शक्य नसेल तर अतहर खानने हिंदू धर्म स्वीकारल्यानंतरच लग्न केले जावे, असेही त्यांनी म्हटले आहे. अतहर खानची घरवापसी व शुद्धी कार्य हिंदू महासभा करेल असे सांगण्यासही शर्मा विसरले नाहीत.
स्त्रोत : लोकसत्ता