Menu Close

निधर्मी शासनव्यवस्थेत चर्च, मशीद नव्हे; तर सरकार केवळ हिंदूंचीच मंदिरे कह्यात घेत आहे ! – गोविंद चोडणकर

सावईवेरे (गोवा) येथे हिंदु धर्मजागृती सभेला हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

savaivere_sabha

सावईवेरे : एकही चर्च, मशीद सरकारच्या कह्यात नाही; मात्र हिंदूंची मंदिरे सरकारने कह्यात घेतली आहेत. आमच्या मंदिरातील पैसा सरकार अल्पसंख्यांकांवर उधळत आहे. या निधर्मी राज्यव्यवस्थेत अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन केले जात आहे आणि हिंदूंचे शोषण होत आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. गोविंद चोडणकर यांनी श्री अनंत देवस्थान सभामंडप, सावईवेरे, फोंडा, गोवा येथे झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेत बोलतांना केले.

या वेळी हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या सौ. राजश्री गडेकर, सनातन संस्थेच्या सौ. आनंदी वानखडे उपस्थित होत्या. शंखनाद आणि वक्त्यांच्या हस्ते झालेल्या दीपप्रज्वलनाने सभेला प्रारंभ झाला. श्री. पंकज बर्वे आणि श्री. पवन बर्वे यांनी वेदमंत्रपठण केले. श्री. श्रीकांत शेट वेरेकर आणि माजी शिक्षक, पत्रकार अन् जिल्हा पंचायत सदस्य श्री. मोहन वेरेकर या धर्माभिमान्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन श्री. राहुल वझे आणि कु. सुमेधा पाटील यांनी केले.

savaivere_sabha_upastiti

कायसूव (बार्देश) येथील धर्माभिमानी श्री. अंकित साळगावकर यांनी बिलिव्हर्सपंथियांच्या खोटारडेपणाविषयी आलेले अनुभव उपस्थितांना सांगून ‘हिंदूंनी या बिलिव्हर्सपंथियांपासून सतर्क रहावे’, असे आवाहन केले.

हिंदूंनी आत्मबळ वाढवणे आवश्यक ! – सौ. राजश्री गडेकर

स्वसंरक्षण म्हणजे स्वत:चे, कुटुंबाचे आणि पर्यायाने देशाचे रक्षण करणे होय. स्वत:चे रक्षण करण्यासाठी स्वसंरक्षण घेतले, तर आमचे आत्मबळ वाढणार आहे. आपण निर्भय बनणार आहोत. आपल्याकडे क्षात्रतेज जागृत होणार आणि प्रतिकार करण्याची शक्ती वाढणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने धर्माचरण करण्यासह स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.

हिंदूंनी देवतांचा अवमान रोखण्यासाठी कृतीशील व्हावे ! – सौ. आनंदी वानखडे

कोणीही यायचे आणि आमच्या देवतांविषयी काहीही बोलायचे, हे नेहमीचे झाले आहे. मडगाव येथे दक्षिणायन परिषदेत हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या संघटनांवर खोटे आरोप करण्यात आले. पुरोगामीत्वाच्या नावाखाली हिंदूंवर रोषारोप करणे आता थांबवले पाहिजे.

क्षणचित्रे

१. सभेला सनातनच्या ६२ व्या संत पू. (सौ.) सुमन (मावशी) नाईक उपस्थित होत्या. त्यांचा या वेळी सन्मान करण्यात आला.
२. सभेच्या पूर्वी श्रीमती आनंदी खेडेकर या ८० वर्षांच्या धर्माभिमानी आजींनी संपूर्ण सभागृहातील कचरा काढण्याची सेवा केली.
३. स्थानिक वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी श्री. संजय नाईक यांनी सभेचे चित्रीकरण केले.
४. गावातील शिलकर कुटुंबियांनी सभेसाठी कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांच्या भोजनाची सोय केली.
५. श्री. विष्णुदास कामत या दैनिक सनातन प्रभातच्या वाचकाने स्वत:च्या वाहनाला पत्रके लावून सभेचा प्रचार केला. सभेच्या दिवशी वाहनातून सामानाची ने-आण केली. त्यांनी सभेनंतरच्या सेवांमध्येही सहभाग दर्शवला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *