भाग्यनगर (हैद्राबाद) : तेलंगणच्या राजधानीचे शहर असलेल्या भाग्यनगरपासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या नलगोंडा जिल्ह्यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २० नोव्हेंबरला क्रियाशील हिंदुत्वनिष्ठांची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपस्थितांना हिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली. स्थानिक स्तरावर राष्ट्र आणि धर्म यांच्याशी संबंधित उपक्रम राबविण्याविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला धर्माभिमान्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. समितीचे श्री. चेतन जनार्दन यांनी धर्माभिमान्यांना मार्गदर्शन केले.
क्षणचित्रे
१. स्थानिक धर्माभिमानी श्री. शिवा यांनी बैठक यशस्वी करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले, तसेच त्यांना दोन धर्माभिमान्यांनी बैठकीच्या सिद्धतेसाठी साहाय्य केले.
२. ‘आयबीसी’ या स्थानिक दूरचित्रवाहिनीने या कार्यक्रमाची प्रसिद्धी केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात