हिंदूंच्या देवतांच्या विडंबनाच्या विरोधातील आंदोलनाला यश !
नेवाडा (अमेरिका) : संकेतस्थळावरून व्यापार करण्यास अग्रेसर असलेल्या चीनच्या ‘अलीबाबा’ आस्थापनाने हिंदूंच्या देवतांची चित्रे असलेल्या ‘योग चटई’ची संकेतस्थळावरून विक्री चालवली होती. हिंदूंच्या देवतांच्या या विडंबनाच्या विरोधात धर्माभिमानी हिंदूंनी आंदोलन छेडताच सदर आस्थापनाने या योग चटया २४ घंट्याच्या आत संकेतस्थळावरून काढून टाकल्या.
‘अलीबाबा’ आस्थापनाने या चटईंवर श्री गणेश, श्रीकृष्ण, शिव आणि विष्णु या देवतांची चित्रे रेखाटली होती. भूमीवर बसण्यासाठी वापरण्यात येणार्या या चटईंवर देवतांची चित्रे रेखाटणे अयोग्य आहे. हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अनादर करण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे हे विडंबन तातडीने रोखण्यात यावे, अशी मागणी हिंदूंनी केली होती. हिंदूंनी केलेल्या विरोधाला अनुसरून सदर आस्थापनाने संकेतस्थळावरील विक्री थांबवली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात