कोल्हापूर : येथे ११ डिसेंबर या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण अधिवक्त्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांना देण्यात आले. या वेळी सनातन संस्थेच्या डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे उपस्थित होते. शिरोली (पु) येथे २८ नोव्हेंबर या दिवशी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी अधिवक्त्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यानिमित्त त्या तेथे आल्या होत्या.
या वेळी शिरोली (पु) ग्रामपंचायत समितीच्या सदस्या सौ. रूपाली खवरे उपस्थित होत्या. रामतीर्थकर यांनी ‘हिंदु धर्माची संस्कृती’ या विषयावर व्याख्यान केले. या वेळी श्री. दुसे यांनी कोल्हापूर येथील सभेला उपस्थित रहाण्याचे सर्वांना आवाहन केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात