कोल्हापूर : येथे ११ डिसेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण शिवसेनेचे राधानगरी (जिल्हा कोल्हापूर) येथील आमदार श्री. प्रकाश अबिटकर यांना देण्यात आले. विशेष म्हणजे त्यांनी येथील सनातन सेवाकेंद्रास सदिच्छा भेट देऊन हे निमंत्रण स्वीकारले. या वेळी समितीचे श्री. मधुकर नाझरे आणि दैनिक सनातन प्रभातचे वार्ताहर श्री. सचिन कौलकर यांनी श्री. अबिटकर यांना समितीने राबवलेल्या मोहिमांची माहिती दिली.
या वेळी श्री. अबिटकर यांनी विधानसभा अधिवेशनात राष्ट्र आणि धर्म यांवरील विषय मांडू आणि त्यांना पाठिंबा देऊन सहकार्य करू, असे आश्वासन दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात